उरणच्या सागरी किनाऱ्यावर चोख सुरक्षा व्यवस्था

मुंबईपासून जवळ असलेला उरणचा सागरी किनारा १९९३ पासून नेहमीच संवेदनशील राहिला आहे. या किनाऱ्यावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

मुंबईपासून जवळ असलेला उरणचा सागरी किनारा १९९३ पासून नेहमीच संवेदनशील राहिला आहे. या किनाऱ्यावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून मोरा ते उरण मार्गावर बॅरिकेट्स लावून तपासणी सुरू करण्यात आली आहे.
उरण सागरी किनारा १९९३ पासूनच संवेदनशील म्हणून गणला गेला आहे. २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतरही उरणमध्ये पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन सुरू होते. दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याने सावधगिरी म्हणून मोरा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एस.पठाण यांनी मोरा सागरी हद्दीत मोडणाऱ्या घारापुरी, केगांव, हनुमान कोळीवाडा तसेच मोरा परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच, प्रमुख पदाधिकारी, सागरी सुरक्षा दलाचे व ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य यांची बैठक घेतली होती. या बैठकीत मच्छीमारांनी समुद्रात संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या अनोळखी बोटींची माहिती तातडीने द्यावी, तसेच बोटींसाठी वाजवीपेक्षा अधिक भाडे देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचीही माहिती देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Strong security on the sea shore of uran