scorecardresearch

कल्याणमध्ये बिर्ला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्याला बेदम मारहाण

विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे प्रकार वाढल्याने पोलिसांनी महाविद्यालय परिसरात गस्त वाढविण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

कल्याणमध्ये बिर्ला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्याला बेदम मारहाण
प्रातिनिधिक फोटो-लोकसत्ता

कल्याण- जुन्या भांडणाचा राग मनात धरुन बिर्ला महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एक विद्यार्थी आणि त्याच्या मित्राला महाविद्यालयाच्या प्रवेशव्दारावर सोमवारी दुपारी चार जणांनी बेदम मारहाण केली. गेल्या काही दिवसांपासून कल्याण, डोंबिवलीतील महाविद्यालयांबरोबर विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचे प्रकार वाढल्याने पोलिसांनी महाविद्यालय परिसरात गस्त वाढविण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

हेही वाचा >>> उल्हासनगर: बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; रस्ते कामावरून जुंपली, दोघे जखमी

जयदीप विठ्ठल जाधव (१९, रा. कोनगाव, भिवंडी) असे मारहाण झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. दीपेश लोखंडे आणि त्याच्या तीन मित्रांनी जयदीपला मारहाण केली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले, जयदीप जाधव आणि त्याचा मित्र सोमवारी दुपारी बिर्ला महाविद्यालयात फाऊंडेशन कोर्सचा परीक्षेचा पेपर संपवून घरी जाण्यासाठी महाविद्यालया बाहेर पडला होता. महाविद्यालय प्रवेशव्दारावर जयदीप अभिषेक पोले या आपल्या मित्रा सोबत बोलत उभा होता. त्यावेळी जुन्या भांडणाचा राग मनात धरुन जयदीपला मारहाण करण्यासाठी दिपेश लोखंडे तेथे मित्रांसह पाळत ठेऊन उभा होता. जयदीपला पाहताच दीपेश आणि त्याचे तीन मित्र त्याच्या दिशेने धावत जाऊन थेट मारहाण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दीपेशचा मित्र अभिषेक भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडला. त्यालाही आरोपींनी बेदम मारहाण केली. ही मारहाण सुरू असताना एका आरोपी तरुणाने धारदार टणक वस्तू घेऊन ती जयदीप आणि अभिषेकला मारली. त्यात दोघेही जखमी झाले. मारहाणी नंतर आरोपी पळून गेले. साहाय्यक पोलीस निरीक्षक एस. एस. सुरवसे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-12-2022 at 12:37 IST

संबंधित बातम्या