ठाणे जिल्ह्यात १८ बालविवाह रोखण्यात यश, सरकारी यंत्रणांची ३६ महिन्यांतील कामगिरी

जिल्ह्यात विविध भागांमध्ये गेल्या ३६ महिन्यांमध्ये १८ बालविवाह रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले आहे. मात्र, शहराच्या काही भागांत बालविवाह सुरूच असल्याचे वास्तव समोर आले आहे.

minor girl marriage
ठाणे जिल्ह्यात १८ बालविवाह रोखण्यात यश (संग्रहित छायाचित्र लोकसत्ता टीम )

स्नेहा जाधव-काकडे

ठाणे : जिल्ह्यात विविध भागांमध्ये गेल्या ३६ महिन्यांमध्ये १८ बालविवाह रोखण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश आले आहे. मात्र, शहराच्या काही भागांत बालविवाह सुरूच असल्याचे वास्तव समोर आले आहे. ठाणे, कल्याण तालुक्यांत सर्वाधिक बालविवाहाच्या तक्रारी आढळून आल्या आहेत. करोनाकाळात आर्थिक स्थिती बिकट असल्याने अनेक मुलींना पालकांच्या दबावापोटी शिक्षण अर्धवट सोडावे लागले. काही मुलींचे करोनाकाळात त्यांच्या पालकांनी विवाहही पार पाडले. त्यांना पुढे शिकण्याची इच्छा असूनही कुटुंबीयांनी त्यांना परवानगी दिली नाही.

१ मार्च २०२० ते १ मार्च २०२३ या कालावधीत १८ बालविवाह रोखण्यात आले आहेत. करोनाकाळात अनेक निर्बंध राज्य सरकारने आणले होते. या वर्षी मागील तीन महिन्यांत एक बालविवाह रोखला गेला. तर या वर्षांच्या तुलनेत २०२२ या वर्षी पाच बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले आहे. बाल संरक्षण कक्ष, स्थानिक पोलीस, सामाजिक संस्था, महिला व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी यांच्या माध्यमातून हे विवाह रोखण्यात यश आले आहे. 

प्राप्त माहितीच्या आधारे झालेल्या कारवाईत मार्च २०२२ ते मार्च २०२३ या वर्षांत १ बालविवाह रोखण्यात आले. यापूर्वी २०२२ मध्ये ५ बालविवाह रोखले गेले होते. तर २०२१ मध्ये सर्वाधिक आठ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. एकीकडे समाजात जनजागृती वाढत असताना नागरिकांकडून प्राप्त तक्रारींचे प्रमाण वाढत असल्याने कारवाईत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. सधन तालुक्यांत बालविवाहांचे प्रमाण चिंताजनक आहे. ठाणे आणि कल्याण तालुक्यात प्रत्येकी पाच तक्रारी नोंदविल्या गेल्या. त्यापाठोपाठ उल्हासनगर ३, शहापूर आणि भिवंडीत प्रत्येकी दोन, तर सर्वात कमी तक्रारी म्हणजेच एक तक्रार मुरबाड तालुक्यातून नोंदविण्यात आल्या. महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात बालविवाह होण्याचे प्रमाण कमी दिसून येते. करोनाकाळामध्ये निर्माण झालेल्या समस्यांमुळे मुलींचे लग्न लावून जबाबदारीमधून सुटका करून घेण्याकडे असलेला कल, स्थलांतर अशा विविध कारणांमुळे बालविवाहांची संख्या वाढल्याचे दिसून आले. मात्र त्याच वेळी अवैधरीत्या होणारे हे विवाह थांबावे व मुलींचे आयुष्य सुरक्षित राहावे यासाठी मदत कक्ष, सामाजिक संस्था तसेच प्रशासन यांनी एकत्रितरीत्या काम केल्याने २०२१ या वर्षी आठ बालविवाह रोखण्यात यम्श मिळाले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-03-2023 at 00:02 IST
Next Story
ठाण्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याला शिंदे समर्थकांची मारहाण; मारहाणीचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित
Exit mobile version