गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली १०० धावपटुंची यशस्वी दौड | Successful race of 100 runners from Gateway of India to Dombivli amy 95 | Loksatta

गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली १०० धावपटुंची यशस्वी दौड

डोंबिवलीतील नागरिकांनी या धावपटुंचे डोंबिवली शहराच्या प्रवेशद्वारावर उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

gatway to dombiwali marathon
(गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली दौडमध्ये सहभागी झालेले धावपटू.)

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारतीय सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी येथील रनर्स क्लॅन क्लबतर्फे २६ जानेवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली ६५ किलोमीटर दौडचे आयोजन केले होते. १०० धावपटू या मोहिमेत सहभागी झाले होते. २६ जानेवारीच्या रात्री १२ वाजता या धावपटुंनी गेटवे ऑफ इंडिया येथून धावण्यास सुरुवात केली. सकाळी साडे वाजता ते डोंबिवलीत दाखल झाले.

हेही वाचा >>>ठाणे: कोपरी पूल उद्घाटनासाठी कोपरी पूलाच्या मार्गिका पुन्हा बंद ?

डोंबिवलीतील नागरिकांनी या धावपटुंचे डोंबिवली शहराच्या प्रवेशद्वारावर उत्स्फूर्तपणे स्वागत केले. शहराच्या विविध भागात फिरून आल्यानंतर एमआयडीसी भागात या धावपटुंचा सन्मान करण्यात आला. २५ ते ७० वयोगटापर्यंत नागरिक या दौडमध्ये सहभागी झाले होते. कडाक्याची हुडहुडी भरविणारी थंडी, पहाटेचे धुके अशा वातावरणात धावपटू सलग आठ तास धावत होेते. सामान्य नागरिकांबरोबर डाॅक्टर, वकील, अभियंते, कार्पोरेट, उद्योजक या दौडमध्ये सहभागी झाले होते.

हेही वाचा >>>कल्याण: तडीपारीचा सोक्षमोक्ष लावण्याचे कल्याणच्या बंड्या साळवी यांचे पोलिसांना आवाहन

गेटवे ऑफ इंडिया, मंत्रालय, शीव, वडाळा, चेंबूर, वाशी, महापे, शिळफाटा, पिंपळेश्वर मंदिर येथून धावपटुंनी गुरुवारी, प्रजासत्तक दिनी सकाळी डोंंबिवलीत प्रवेश केला. शहरातील नागरिकांनी, शाळकरी मुलांनी या धावपटुंची स्वागत केले. या उपक्रमाच्या माध्यमातून जमा होणार निधी संरक्षण दलात भरती होण्यासाठी इच्छुक तरुणांना मोफत मार्गदर्शन करण्यासाठी केंद्र उभारणे, अद्ययावत ग्रंथालयाची उभारणी करणे या कामासाठी वापरण्यात येणार आहे, असे आयोजकांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 15:10 IST
Next Story
ठाणे: कोपरी पूल उद्घाटनासाठी कोपरी पूलाच्या मार्गिका पुन्हा बंद ?