कल्याण – कल्याण, डोंबिवली शहरातील दोन वेगळ्या घटनांमध्ये दोन तरुणांनी शुक्रवारी आत्महत्या केल्या. डोंबिवलीतील एका प्रकरणात तरुणाला मैत्रिणीने भेटण्यास नकार दिला म्हणून नैराश्य आल्याने तरुणाने मैत्रिणीच्या राहत्या घराच्या चौथ्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तर, कल्याणमधील ११ वर्षाच्या तरुणाने आपले प्रेमप्रकरण उघड झाल्याने आलेल्या तणावातून आत्महत्या केली.

डोंबिवलीतील मानपाडा, कोळसेवाडी पोलीस ठाण्यात या दोन्ही प्रकरणांच्या नोंदी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील एक तरुण स्वप्निल अनिल धुमाळ (२३) हा डोंबिवलीत आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता. परंतु, मैत्रिणीने त्याला भेटण्यास नकार दिला. यामधून त्याला नैराश्य आले. या नैराश्यातून त्याने मैत्रिणीच्या राहत्या घराच्या चौथ्या माळ्यावरील गच्चीवर जाऊन जमिनीवर उडी मारून आत्महत्या केली. या तरुणाला तातडीने पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे उपचार सुरू असताना त्याचा शुक्रवारी मृत्यू झाला. मानपाडा पोलीस ठाण्याचे हवालदार एस. के. आढाव यांच्या तक्रारीवरून या मृत्यूप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

Sanjay Rathod case, death of young woman,
संजय राठोड प्रकरण : तरुणीचा मृत्यू अपघात किंवा आत्महत्या असल्याचा निष्कर्ष कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाचा सवाल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Dombivli Nigerian citizen committed suicide by jumping from 15th floor
डोंबिवलीत पलावा येथे नायजेरीयन नागरिकाची पंधराव्या माळ्यावरून उडी मारून आत्महत्या
son kills mother Ghaziabad crime news
Son Kills Mother: वीस हजारांसाठी जन्मदात्या माऊलीचा खून; मित्रांनी आईचे हात धरले, मुलानं वीट घेतली आणि…
Businessman commits suicide due to financial fraud Pune print news
आर्थिक फसवणूक झाल्याने व्यापाऱ्याची आत्महत्या; सातजणांविरुद्ध गुन्हा
Two people including a woman committed suicide under a running train in Pune railway station
पुणे रेल्वे स्थानकात धावत्या रेल्वेखाली महिलेसह दोघांची आत्महत्या
suicide
बदलापूरमध्ये कुटुंबीयांनी वेडी ठरविल्यामुळे विवाहितेची आत्महत्या
woman trying to suicide mumbai , police saved woman Mumbai, Mumbai news,
आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे पोलिसांनी वाचवले प्राण

हेही वाचा – बदलापूर: बुधवारी जिल्हा परिषद शाळा बंद शिक्षक संघटनांची सामूहिक रजा, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

हेही वाचा – डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा

कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी भागात राहत असलेल्या एका ११ वर्षांच्या मुलाने शुक्रवारी आई, वडील घरात नाहीत पाहून टिटवाळा येथील एका अल्पवयीन मुलीला घरी आणले होते. बाहेर गेलेले आई, वडील अचानक घरी आले. त्यावेळी घरात मुलगा आणि त्याची मैत्रिण होती. पालकांनी अल्पवयीन मुलाला मुलीची माहिती विचारली. ती घरी का आली होती असे प्रश्न केले. त्यानंतर पालकांनी त्या मुलीला घेऊन तिला टिटवाळा येथे तिच्या घरी सोडण्यास गेले. यावेळी अल्पवयीन मुलगा घरात एकटाच होता. आई, वडील परतल्यावर आपल्याला ओरडतील या भीतीने अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कोळसेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.