राज्याच्या राजकारणामध्ये सध्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारने घेतलेल्या एका निर्णयावरुन वातावरण तापलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये हजारो धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले असून ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याचवरुन आता महाराष्ट्र सरकारवर टीका केली जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. पत्रकार परिषदेमध्ये या प्रश्नाला उत्तर देताना हा विषय आपल्यासाठी महागाईपेक्षा अधिक महत्वाचा नसल्यांच सुळे यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेला परवानगी मिळाल्याबद्दल विचारलं असता राऊत राष्ट्रवादीचा संदर्भ देत म्हणाले, “महाराष्ट्रात अनेक…”

ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये योगी सरकारने भोंगे उतरवल्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुप्रिया यांनी, “खरं सांगू का माझ्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान महागाई हे आहे. आता महागाईचं सर्वात मोठं आव्हान समोर असताना मला काही सुचतच नाहीय,” असं म्हटलं.

महागाईबद्दल व्यक्त केली चिंता…
पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी, “महागाई हा फार गंभीर मुद्दा आहे. विरोधक म्हणून मी हे बोलत नाहीय पण सर्वसामान्य जनतेसमोर कोणतं आव्हान आहे तर ते महागाईचं आहे. त्यामध्ये जातीने लक्ष घालून गांभीर्याने हे विषय आपण घेतले पाहिजेत,” असं म्हटलं. मी नेहमीच महागाई विरोधात बोलत असते असं सुप्रिया यांनी सांगितलं. माझी लोकसभेमधील भाषणं ऐका त्यामधून तुम्हाला मी हा मुद्दा किती वेळा मांडते हे समजेल, असंही त्यांनी म्हटलं. फक्‍त आपल्‍या ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍राज्यात महागाई नाही तर संपूर्ण देशात महागाई आहे, असंही सुप्रिया यांनी म्हटलंय. “भोंगा आणि बाकीच्या गोष्ठीत लक्ष घालत नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

नक्की वाचा >> योगी सरकारने ११ हजार धार्मिक स्थळांवरील भोंगे काढल्यासंदर्भात अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आपण महाराष्ट्रात…”

कायदा सुव्यवस्थेसंदर्भात काय म्हणाल्या…
राज्यातील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात बोलताना, “राज्याचे गृहमंत्री सक्षम आहेत ते सागळे सांभाळून घेतील. महाराष्ट्राच्या पोलिसांवार माझा पूर्ण विश्वास आहे,” असं सुप्रिया म्हणाल्या.

नक्की वाचा >> ‘योगी आणि भोगी’ वक्तव्यावरुन संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला; म्हणाले, “एखाद्याला पीएचडी करायची असेल तर…”

जीएसटीच्या पैशांवरुन टीका…
“मी लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले आहे तिथूनच प्रश्न सोडवण्या पासून मला वेळ नसतो, असंही सुप्रिया यांनी इतर विषयांसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना म्हटलं. “राज्याचे जीएसटीचे पैसे केंद्र सरकारकडू येण्यासाठी कितो वेळ होत आहे. या जीएसटीच्या पैशांचा पाठपुरवठा आम्ही नेहमीच करत असतो. जर जीएसटीचे पैसे आले नाही तर राज्याची त्या पैशांवर जे काम अवलंबुन आहेत ती होणार नाही,” असं सुप्रिया यांनी म्हटलं.

नक्की वाचा >> इंधनावरील कर कमी करण्याच्या मोदींच्या सल्ल्यावर अर्थमंत्री अजित पवार म्हणाले, “केंद्र सरकारने देखील पेट्रोल-डिझेलवर कर लावताना…”

मुख्यमंत्र्यांचं ट्विटर हॅण्डल पाहिलं तर कुठल्या सरकारने अधिक टॅक्स दिलाय हे लिहिलं आहे. तो केंद्र आणि राज्याचा अधिकृत माहितीच्या आधारे दिलेला डेटा आहे.आपले जीएसटीचे पैसे मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय, असंही त्या म्हणाल्या.