शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना आपल्या भाषणातून लक्ष्य केलं आहे. रायगडमधील कर्जत येथे गुरुवारील प्रबोधन यात्रेदरम्यान पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये अगदी राज ठाकरेंची नक्कल करत सुषमा अंधारेंनी मनसेप्रमुखांना टोला लगावला आहे.

नक्की पाहा >> पुणे: …अन् ती महिला सावरकरांच्या फोटोलाच जोडे मारायला निघाली; शिंदे गटाच्या आंदोलनातील Video चर्चेत

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
What Kishori Pednekar Said About Raj Thackeray ?
किशोरी पेडणेकरांची राज ठाकरेंवर टीका; “दात पडलेला, नखं काढलेला, शक्तीहीन वाघ लोकांना..”
eknath shinde devendra fadnavis
महायुतीत वादाची ठिणगी? भाजपा आमदार शिंदे गटातील खासदारावर टीका करत म्हणाले, “भ्रष्टाचाऱ्यांना…”
sharad pawar group on prafull patel statement
“शरद पवार भाजपाबरोबर येण्यास अनुकूल”, प्रफुल्ल पटेलांच्या दाव्यावर राष्ट्रवादीच्या पवार गटाकडून स्पष्टीकरण; म्हणाले, “हा प्रस्ताव…”

सुषमा अंधारे या त्यांच्या भाषणाच्या शैलीसाठी ओळखल्या जातात. राज्यामध्ये जून महिन्यात झालेल्या सत्तांतरणानंतर आपल्या भाषणामुळे चर्चेत असलेल्या अंधारे मागील काही आठवड्यांपासून प्रबोधन यात्रेच्या निमित्ताने राज्यातील वेगवगेळ्या भागांचे दौरे करत आहेत. या भाषणांमधून त्या विरोधकांना लक्ष्य करत असतानाच त्यांच्या भाषणाची शैली चर्चेचा विषय ठरतेय. गुरुवारी कर्जतमध्ये झालेल्या भाषणात त्यांनी राज ठाकरेंच्या भोंग्यांविरोधातील आंदोलनादरम्यानचा संदर्भ देत नक्कल केली. राज ठाकरेंचा उल्लेख ‘आमचे चुलत भाऊ’ असा करत अंधारेंनी टोला लगावला.

नक्की वाचा >> सावरकरांच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी? संजय राऊतांचा राहुल गांधींना टोला; म्हणाले, “जे लोक कधी…”

राज ठाकरे भाषणात करतात तसे हातवारे करत सुषमा अंधारेंनी आवाज बदलून ‘ए.. ए… काढ ते… काढ रे ते भोंगे… इथं काय चाललंय’ असं म्हणत राज यांनी नक्कल केली. पुढे बोलताना, “अरे काय हे? आता कुठे गेलं ते सगळं? आता काय झालं?” असे प्रश्न विचारत सरकार बदलल्यानंतर राज यांची भूमिका बदलली आहे का असा सवाल अंधारे यांनी केला. तसेच, “जाणीवपूर्वकपणे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न ज्या ज्या लोकांनी केला त्यांनी ठरवून टाकलं आहे की इथे लोकशाही आणि शांतताच नांदूच द्यायची नाही,” असा टोलाही अंधारेंनी राज यांचा संदर्भ देत लगावला.

नक्की वाचा >> “२०२३ मध्ये राज्यात निवडणूका लागणार; भाजपामध्येच प्रचंड…”; सुषमा अंधारेंनी सांगितलं ‘कामाला लागा!’

मागील महिन्यात अंधारे यांनी मिमिक्रीचा संदर्भ देत राज यांच्यासंदर्भात भाष्य केलं होतं. ठाण्यामध्ये दसऱ्याच्या काही दिवसांनंतर पार पडलेल्या उद्धव ठाकरे गटाच्या ‘महाप्रबोधन यात्रे’मध्ये उद्धव ठाकरे समर्थक नेत्यांच्या भाषणांवरुन गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल करणे, राष्ट्रपतींचं नाव घेऊन खिल्ली उडवणारं भाष्य करणे यासारखे आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आले. त्याचबरोबरच उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या आणि प्रवक्त्या सुषमा अंधारेेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता सुषमा अंधारे यांनी थेट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा उल्लेख करत सत्ताधारी शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीला आव्हान दिलं होतं.

ठाण्यात झालेल्या कार्यक्रमानंतर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतरही अंधारे यांनी अगदी पूर्वीप्रमाणेच शाब्दिक कोट्या करत सत्ताधारी शिंदे गटाला लक्ष्य केलं होतं. विशेष म्हणजे दाखल झालेल्या गुन्ह्याचा संदर्भ देत त्यांनी थेट राज ठाकरेंचा उल्लेख चुलत भाऊ असा केला आणि त्यांना वेगळा कायदा लागू होतो का असा प्रश्न सत्ताधाऱ्यांना विचारला होता. कायद्यानुसार सर्वांना नियम सारखे हवेत असं असताना राज यांच्या नकलांवरुन कधी गुन्हे दाखल झाले का असा सवाल करत माझ्यासाठीच वेगळा नियम का असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला होता.

“तुमच्यावर गुन्हा दाखल होईल. आमचे राज दादा. ते आमचे चुलत भाऊ आहेत. एकनाथ भाऊ सख्खे भाऊ आहेत,” असं सुषमा अंधारेंनी म्हणताच सभागृहात हशा पिकला होता. त्यानंतर अंधारे यांनी, “राज दादा आमचे चुलत भाऊ. आमचे राज दादा एवढ्या सगळ्या मिमिक्र्या करतात त्या वेळी काय करता? राज भाऊंवर किती केसेस दाखल केल्या तुम्ही विचारलं पाहिजे,” असं म्हटलं होतं. इतकच नाही तर अगदी इंग्रजीमध्ये अंधारे यांनी, “कायद्यामधील तिसऱ्या कलमातील १४ व्या तरतुदीनुसार कायद्यासमोर समान आहेत,” असं एकदम वकिली थाटात सांगितलं होतं.  “मग जो कायदा राज ठाकरेंना लागू आहे तोच मला लागू का होत नाही?” असा प्रश्न विचारला होता.