दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल यंदा ९७.१३ टक्के लागला आहे. जिल्ह्यातील विविध भागांमधून यंदाच्या वर्षी १ लाख १७ हजार १८३ विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख १३ हजार ८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी दहावीच्या निकालात सुमारे दोन टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना प्रादूर्भावामुळे गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दहावीचा निकाल कसा लावणार याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, नववी आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्यात आला होता. मागील वर्षी जिल्ह्याचा ९९. २८ टक्के इतका निकाल लागला होता. यंदाच्या वर्षी करोना प्रादूर्भाव ओसरल्यामुळे राज्य मंडळाने दहावीच्या परिक्षा लेखी स्वरुपात घेतली होती. यंदा जिल्ह्याच्या निकालात सुमारे दोन टक्क्यांनी घसरण झाली आहे. जिल्ह्याचा निकाल ९७.१३ टक्के लागला असल्याची माहिती जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी ललिता दहितुले यांनी दिली.

जिल्ह्यातील विविध भागांमधून यंदाच्या वर्षी १ लाख १७ हजार १८३ विद्यार्थी या परिक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख १३ हजार ८२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.त्यामध्ये ५९ हजार ४३५ मुले तर, ५४ हजार ३९० मुलींचा समावेश आहे.मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९६.३१ टक्के इतके आहे. तर, मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.०४ टक्के इतके आहे. जिल्ह्यातील मिरा भाईंदर शहरात यंदा सर्वाधिक म्हणजेच ९८.४० टक्के निकाल लागला आहे.

शहर निहाय निकाल टक्केवारीत
तालुक्याचे नाव उत्तीर्ण मुले उत्तीर्ण मुली एकुण निकाल
कल्याण ग्रामीण ९७.५६ ९९.०९ ९८.२५
अंबरनाथ ९६.६३ ९८.४२ ९७.४७
भिवंडी ९४.११ ९६.९९ ९५.४७
मुरबाड ९६.२७ ९७.६८ ९६.९३
शहापूर ९३.८० ९६.९२ ९५.२३
ठाणे महापालिका क्षेत्र ९६.३७ ९८.०२ ९७.१५
नवी मुंबई ९७.२२ ९८.४७ ९७.८०
मीरा भाईंदर ९८.०१ ९८.८२ ९८.४०
कल्याण डोंबिवली ९७.१३ ९८.४५ ९७.७५
उल्हासनगर ९३.२३ ९५.९६ ९४.५७

भिवंडी पालिका क्षेत्र ९४.८३ ९७.७२ ९६.२५

एकुण ९६.३१ ९८.०४ ९७.१३

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tenth result of thane district exams district secondary education officer amy
First published on: 17-06-2022 at 14:41 IST