ठाण्यातील सिलिका सायंटिफिक कंपनीला भीषण आग; अंबिकानगरचा वीजपुरवठा खंडित

वागळे इस्टेट येथील अंबिकानगर भागात शनिवारी रात्री एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली.

ठाणे – अंबिका नगर २, वागळे इस्टेट, ठाणे(प.) या ठिकाणी रोड नंबर २९ मध्ये प्लॉट नंबर ए-२०२ सिलिका सायंटिफिक (मालक: अक्षय कदम) या प्रयोगशाळेतील सामान तयार करण्याचा कंपनीमध्ये आग लागली आहे. वागळे इस्टेट येथील अंबिकानगर भागात शनिवारी रात्री एका कंपनीमध्ये भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे रात्री उशीरापर्यंत कळू शकले नव्हते. सदर घटनास्थळी महावितरण कर्मचारी, वागळे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे कर्मचारी २- फायर वाहन, १- रेस्क्यू वाहन, २ वॉटर टँकरसह उपस्थित असून, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांन कडून सदर आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर कंपनी मध्ये एलपीजी गॅस सिलेंडर असल्यामुळे स्फोट होत आहेत. आठ ते नऊ स्फोट झाले आहेत.

अंबिकानगर येथील रोड नंबर २९ परिसरात एक कंपनी आहे. शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास एका कंपनीला भीषण आग लागली. अवघ्या अर्ध्या तासामध्ये याठिकाणी एकूण पाच स्फोट झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले होते. अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून रात्री उशीरापर्यंत आग विजविण्याचे प्रयत्न सुरू होते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Terrible fire company company fire incident firefighting team ysh

Next Story
दीड हजारांहून अधिक बालके कुपोषित: शहरी पट्टा वाढत असतानाही कुपोषणाचे प्रमाण अधिकच; गेल्या वर्षभरात १२२ तीव्र कुपोषित बालकांचा शोध
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी