ठाण्यात ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले आहेत. फेसबुक पोस्ट टाकण्यावरून ठाकरे गटातील महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचं समोर आलं आहे. रोशनी शिंदे असं या मारहाण झालेल्या महिला पदाधिकाऱ्याचं नाव आहे. त्यांच्यावर ठाण्यातील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणात पोलिसांनी अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही. यावर आता रोशनी शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना रोशनी शिंदेंनी सांगितलं की, “ठाण्याचे मुख्यमंत्री झालात. मग गुंडगिरी करण्यासाठी ठाण्याचे मुख्यमंत्री झालात का? दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी. प्रत्येक गोष्टीचा न्याय झाला पाहिजे. माझ्यावर हल्ला झाला, म्हणून मी बोलत नाही. कित्येक महिलांवर अन्याय होत आहे.”

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
arvind kejriwal
‘आप’चे अस्तित्व संपविण्याचा प्रयत्न; केजरीवाल यांच्या सुटकेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान वकिलाचा दावा

हेही वाचा : “राऊत, फाऊत, दाऊद जे असतील, यांना सांगतो…”, मोदींवरील ‘त्या’ विधानावरून फडणवीसांचा राऊतांवर हल्लाबोल

“किती दिवस शांत बसायचं. तुमच्या महिला त्या महिला. आमच्या महिल्या रस्त्यावरील आहेत का? हे सर्व बंद करण्याची विनंती करते. तसेच, पोलिसांनी तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी रोशनी शिंदे यांनी व्यक्त केली आहे.

यावर खासदार राजन विचारे यांनीही भाष्य केलं आहे. “महाराष्ट्राने गेले नऊ महिने चाललेला हा तमाशा आणि अत्याचार पाहिला असेल. प्रत्येक कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. एका युवती सेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला शोरूमच्या कार्यालयात जात लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आहे. ती महिला पदाधिकारी गर्भवती असूनही तिला मारहाण करण्यात आली.”

हेही वाचा : नाना पटोलेंना मुख्यमंत्र्यांकडून महिन्याला एक खोका मिळतो? आशीष देशमुखांचे गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले

“तक्रार दाखल करण्यासाठी गेलो, पण फक्त अर्ज दाखल करून घेण्यात आला. रुग्णालयात तपासण्यासाठी गेलो, तर तिथे दाद देण्यात आली नाही. सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांना छळण्यासाठी सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचे विचार घेऊन पुढे चाललो, असे सांगता. मग, एखाद्या महिलेला चक्कर येईपर्यंत मारहाण करतात, ही अमानुष घटना आहे. उद्या त्या मुलीला काही झाले, तर त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल,” असे राजन विचारे यांनी सांगितले आहे.