ठाणे : लघुशंका करण्यास मनाई केल्याच्या कारणावरून संतापलेल्या एकाने काचेच्या बाटलीने डोक्यावर मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. भिवंडी येथील बाबला कंपाउंड परिसरात ही घटना घडली. याप्रकरणातील हल्लेखोर फरार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – ठाणे शहरात सतिश प्रधान यांच्या नावाची वास्तू उभारणार – खासदार नरेश म्हस्के

हेही वाचा – कल्याण-डोंबिवलीत सुसाट दुचाकी चालविणाऱ्या चालकांवर कारवाई

भिवंडी येथील कल्याण रोड परिसरात तक्रारदार राहतात. ते मुळचे उत्तर प्रदेशचे रहिवाशी आहेत. ते शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास बाबला कंपाउंड परिसरातील गल्लीमधील गाळा नंबर १ समोरून जात होता. त्यावेळेस तिथे एक २४ वर्षीय तरुण लघुशंका करीत होता. त्याला तक्रारदाराने लघुशंका करण्यास मनाई केली. या कारणावरून संतपालेल्या २४ वर्षीय तक्रारदाराला शिवीगाळ करत दमदाटी केली. तसेच त्याने आणलेल्या काचेच्या बॉटलने त्यांच्या डोक्यावर डाव्या कानाच्या वर मारहाण करून दुखापत केली. याप्रकरणी तक्रारदाराने केलेल्या तक्रारीच्या आधारे झालेल्या व्यक्तीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्हयात हल्लेखोर फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane a person was beaten up on the issue of toilet incident at bhiwandi ssb