नातेवाईकाने ४० हजार रुपयांचे कर्ज घेतल्यानंतर रक्कम आणि त्यावरील व्याज असे एक लाख रुपये भरले नाही, म्हणून ऑनलाईन कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून एका महिलेच्या छायाचित्रात बदल करून ते छायाचित्र समाजमाध्यमावर प्रसारित करणार असल्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Maharashtra Political Crisis Live : शिवसेनेने केसेस मागे घ्याव्यात, जनादेशाचा आदर करावा- बावनकुळे

पिडीत महिला घोडबंदर भागात राहते. तिच्या नातेवाईकाने सुमारे महिन्याभरापूर्वी ऑनलाईन कर्ज देणाऱ्या विविध अॅपमधून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या रकमेचे व्याज ६० हजार रुपये झाले होते. असे एक लाख रुपये कर्ज घेतलेल्या व्यक्तीला भरावयाचे होते. परंतु त्या व्यक्तीने कर्जाची रक्कम भरली नाही म्हणून पिडीत महिलेला अचानक मोबाईलवर धमकीचे संदेश आले. त्यानंतर त्या महिलेचे काही छायाचित्र बदलून ते अश्लील बनवून तिला व्हॉट्सॲप वर पाठविण्यात आले. त्यानंतर महिलेने याप्रकरणी संबंधित कर्ज पुरवठा करणाऱ्या अॅप मालकांविरोधात चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.