ठाणे : कळवा येथे आठवड्यापूर्वी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या मृतदेहाची अखेर ओळख पटली आहे. बालजी यादव (३१) असे मृताचे नाव असून आजारपणामुळे त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. तसेच त्याने महिन्याभरापूर्वी आत्महत्या केली असावी असे पोलिसांचे म्हणणे आहे. बालजी याचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत होता. तसेच त्याचा शिर गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. तर धड कुजल्यामुळे झाडाच्या बुंध्याजवळ पडलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळले होते.

कळवा येथील पारसिकनगर अग्निशमन दल केंद्राजवळील जाॅगिंग ट्रॅक परिसरात १० नोव्हेंबरला एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह असल्याची माहिती कळवा पोलिसांना प्राप्त झाली होती. पोलिसांनी या मृतदेहाची पाहाणी केली असता, मृतदेहाचे शिर गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होते. तर त्याचे धड झाड्याच्या बुंध्याला गळून पडले होते. मृतदेहाची ओळख पटविणे पोलिसांना कठीण जात होते. दरम्यान, व्यक्तीच्या शर्टच्या काॅलरवर एका शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव छापील होते. तसेच त्याच्या शर्टच्या खिशामध्ये मुंब्रा येथील एका दवाखान्याची चिठ्ठी होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांची काही पथके तयार करण्यात आली.

police registered murder case after body found on mumbai ahmedabad highway
तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
patient dies due to negligence culpable homicide case registered against doctor
हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
Dahanu devotee loksatta news
डहाणू : महालक्ष्मी गडावर गेलेल्या भाविकाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
chole bhature Two youth found dead in noida room
Death by chhole: ‘छोले’ बनविणं जीवावर बेतलं, गॅसवर पातेलं ठेवून दोन तरुण झोपी गेले; सकाळी झाला मृत्यू
dead body buried
अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह जमिनीत पुरला, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील घटना
pune Mobile filming was done in washroom of girls school
रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांकडून तोडफोड, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की प्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा
27 goats die after drinking water in a cowshed near Barshi
बार्शीजवळ गोठ्यात पाणी प्यायल्यानंतर २७ शेळ्यांचा मृत्यू

हेही वाचा…गडकरींकडून महाराष्ट्र पालथा

संबंधित शिवणकाम करणाऱ्या व्यक्तीच्या दोन महिन्यांची पावती पुस्तके पोलिसांनी तपासली. तसेच दवाखान्यात विचारणा केली असता, २० दिवसांपूर्वी बालगोविंद यादव नावाचा व्यक्ती भाऊ हरविला असल्याची चौकशी करण्यासाठी आला असल्याची माहिती तेथील दवाखान्यातील कर्मचाऱ्याने दिली. पोलिसांनी तात्काळ बालगोविंद याला संपर्क साधला. त्याची विचारणा केली. तसेच मृतदेहाचे कपडे आणि बुट दाखविण्यात आले. हे कपडे आणि बुट त्याचा भाऊ बालजी यादव याचे असल्याचे त्याने स्पष्ट केले. तसेच तो हरविल्याप्रकरणी शिळ डायघर पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल होती. मृताच्या कुटुंबियांची पोलिसांनी चौकशी केली असता, तो आजारी असल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले. तसेच बालजी याने महिन्याभरापूर्वी आत्महत्या केली असावी असा अंदाज देखील पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Story img Loader