ठाणे : घोडबंदर येथील मुल्लाबाग भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाच्या निर्मितीचे काम मुंबईमहानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) सुरु आहे. या कामासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी उद्या, सोमवारपासून ते ८ ऑगस्टपर्यंत वाहतूक बदल लागू केले आहेत. या वाहतूक बदलामुळे अंतर्गत मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना गैरसोय होण्याची शक्यता आहे.
ठाणे ते बोरीवली प्रकार घोडबंदर मार्गावरून करावा लागतो. या मार्गावर अवजड वाहनांचा भार अधिक असतो. त्यामुळे ठाण्याहून बोरीवली अंतर कापण्यासाठी किमान एक ते दीड तास लागतो. हे अंतर काही मिनीटांवर येण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे-बोरीवली भुयारी मार्गाची निर्मिती केली जात आहे. काही महिन्यांपूर्वीच या प्रकल्प कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला होता.
त्यानंतर मुल्लाबाग परिसरात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या भुयारी मार्गाच्या बांधकामासाठी अंतर्गत मार्गावर काम सुरू करण्यात आले आहे. या कामासाठी परिसरात वाहतूक बदल लागू केले आहेत. मुल्लाबाग येथील हिलक्रिस्ट गृहसंकुल येथून नीळकंठ ग्रीनच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना सत्या शंकर गृहसंकुलासमोर प्रवेशबंदी असेल. thane-borivali-twin-tunnel-project-construction-work-mullabagh-ghodbunder-road-traffic-updates Sap 05येथील वाहने विरुद्ध दिशेने वाहतूक करतील. हे वाहतूक बदल सोमवारी, उद्यापासून ८ ऑगस्टपर्यंत लागू असतील. त्यामुळे या वाहतूक बदलाचा सर्वाधिक फटका परिसरातील रहिवाशांना बसण्याची शक्यता आहे.
