ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक हर्षद अहिरराव यांना कारागृहातील उत्कृष्ट सेवेकरीता राष्ट्रपती सुधार सेवा पदक जाहीर झाले आहे. हर्षद अहिरराव यांनी त्यांच्या २७ वर्षाच्या सेवा कालावधीत येरवडा, नाशिक, नागपूर, मुंबई यांसारख्या अतिसंवदेशनशील मध्यवर्ती कारागृहांचे तुरुंगाधिकारी, उपअधीक्षक या पदावर सेवा केलेली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात ते २०१९ पासून अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हर्षद अहिरराव हे १९९५ मध्ये कारागृह विभागात तुरुंगाधिकारी म्हणून रुजू झाले. ठाणे येथे ते मागील तीन वर्षांपासून अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक म्हणून काम पाहतांना त्यांनी कारागृहातील बंद्याच्या सुधारणा आणि पुनर्वसन करण्याच्या हेतूने बंद्यांना विनातारण कर्ज, प्रौढ साक्षरता अभियान,उच्च शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण, करोना कालावधीत बंद्यांच्या नातेवाईकांना सामाजिक संस्थेच्या सहाय्याने रेशन पुरवठा, गरीब व गरजू बंद्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व इतर सामाजिक संस्थेच्या मदतीने मोफत कायदेविषयक सहाय्य मिळवून देण्याकरीता प्रयत्नशिल राहिले आहेत. त्याचबरोबर कारागृहातील बंद्याकरीता योगा, मेडीटेशन, वैद्यकीय शिबीरे आयोजित केले.

बंद्यांच्या आहारात सुधारणा होण्यासाठी ॲटोमॅटीक चपाती मेकींग मशीन, बल्क प्रेशर कुकर, सोलर वॉटर हिटर, जिम, हॉट-पॉट, इत्यादी अत्याधुनिक यंत्रसामग्री बसविण्यात पुढाकार घेतला. या सर्व उपक्रमांबरोबरच त्यांनी ‘विद्यादानम’ प्रकल्पाच्या धर्तीवर गेल्या तीन वर्षात ३००० बंद्यांना साक्षर करुन मुलभूत शिक्षण दिले आहे. अशा प्रकारे सुधारणात्मक कार्यक्रम त्यांनी राबविले. अहिरराव यांच्या२७ वर्षातील उल्लेखनिय कामगिरी करीता यंदाच्या स्वातंत्र्यदिनी त्यांना उत्कृष्ट सेवेकरीता राष्ट्रपतींचे सुधारसेवा पदक जाहीर झाले आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहात रुजू होण्याआधी त्यांनी २०१६ ते २०१९ या काळात मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक म्हणून काम पाहिले होते. कारागृहातील पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी त्यांनी मोठया प्रमाणात कामे केली. यासाठी २०१८ साली कारागृहातील उल्लेखनिय कामगिरी करीता अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधार सेवा, पुणे यांचे सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane central jail superintendent harshad ahirrao was awarded president reform service medal amy
First published on: 15-08-2022 at 11:35 IST