ठाणे : बिहार राज्यात निवडणूकांचा निकाल लागला असून या निवडणूकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळाले आहे. या निवडणूकांच्या निकालानंतर ठाणे रेल्वे स्थानक परिसरात भाजपने मिठाई वाटत जल्लोष साजरा केला.
गेल्याकाही महिन्यांपासून बिहारच्या निवडणूकांकडे देशाचे लक्ष लागले होते. या निवडणूकीमध्ये कोण विजयी होईल अशी चर्चा मागील काही दिवसांपासून होती. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे दिसत असल्याने आता या निवडणूकीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण देशभरात जल्लोष करण्यास सुरुवात केली. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात भाजपने जल्लोष केला. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना मिठाईचे वाटप करण्यात आले. भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी फुगडी खेळत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने घोषणा दिल्या.
