काळानुरूप ठाणे बदलत असले तरी गतकाळातल्या अनेक खुणा अजूनही शहरात ठिकठिकाणी आढळतात. चेंदणी कोळीवाडा, जुनी बाजारपेठ, चरई, टेंभीनाका आदी ठिकाणी जुन्या वाडय़ांचे अवशेष, पूर्वीच्या रहाटाच्या विहिरी अजूनही आहेत. चरईतील दगडी शाळा त्यापैकीच एक. ठाणे शहरातील ही पहिली मराठी माध्यमाची शाळा. अजूनही ही शाळा याच जागेत याच नावाने भरते आणि ओळखली जाते.

(जुने छायाचित्र सदाशिव टेटविलकर यांच्या संग्रहातून, नवे छायाचित्र-गणेश जाधव)