ठाणे : ठाणे न्यायालयातील अतिरिक्त सरकारी अभियोक्ता संध्या बच्छाव यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने रंगेहात पकडले आहे.
संध्या दिनकर बच्छाव या ठाणे न्यायालयात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदावर कार्यरत आहेत.

संध्या यांनी लोकसेविका या नात्याने मिळालेल्या अधिकाराचा आणि पदाचा दुरूपयोग केल्याचे समोर आले आहे. संध्या यांनी वाशी पोलीस ठाण्यात तक्रारदाराने दाखल केलेल्या गुन्हयासंदर्भात न्यायलयात चांगल्या प्रकारे ऑग्र्युमेंट करेल. परंतू, त्यसाठी ५० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता म्हणून १० हजार रूपये स्विकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले.

सदर प्रकरणामध्ये आरोपी लोकसेविका यांनी सदर रक्कम स्विकारून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला म्हणून सदर गुन्हयामध्ये त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली आहे. संध्या यांना सहा महिने साधा कारावास आणि १ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. हा दंड भरला नाही तर दोन महिने साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.