पाच महिन्यांत ठाण्यातील गुन्हेगारीचा चढता आलेख

सर्वाधिक गुन्हे हे अपहरण आणि विनयभंगाशी संबंधित आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

 

गंभीर स्वरूपांच्या गुन्ह्य़ांचे प्रमाण ६५ टक्क्यांवर; अपहरण, विनयभंगाचे गुन्हे सर्वाधिक

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत जुलै ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत गुन्हेगारीने पुन्हा उचल खाल्ली असून खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, दरोडा यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्य़ांचे प्रमाण ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सर्वाधिक गुन्हे हे अपहरण आणि विनयभंगाशी संबंधित आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत बलात्कार प्रकरणी नोंद झालेल्या गुन्ह्य़ांची संख्या १ हजार १५७ इतकी असून यापैकी उकल झालेले गुन्हे १ हजार ०५६ इतके आहेत. घरफोडी प्रकारात नोंदल्या गेलेल्या गुन्ह्य़ांची संख्या ३ हजार ६५१ इतकी असून उकल झालेले गुन्हे १ हजार २७४ इतके आहेत. दाखल झालेल्या खुनाच्या नोंदी ३१५ इतकी असून यापैकी उकल झालेले गुन्हे २८३ आहेत. गेल्या पाच महिन्यांत दरोडय़ांच्या ६४ घटना घडल्या असून यापैकी ६१ गुन्ह्य़ांची पोलिसांनी आतापर्यंत उकल केली आहे. तर इतर चोरीच्या घटनांची नोंद २ हजार २२३ इतकी असून यापैकी उकल झालेले गुन्हे १ हजार ४६७ इतके आहे.

गेल्या पाच महिन्यांमध्ये गुन्ह्य़ांची संख्या वाढतच गेल्याचे ठाणे पोलीस आयुक्तालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. जुलैमध्ये ६ हजार ७०८, ऑगस्टमध्ये ७ हजार ७५६, सप्टेंबरमध्ये ८ हजार ३५७, ऑक्टोबरमध्ये ९ हजार १७५ आणि नोव्हेंबरमध्ये १० हजार १५ इतक्या गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thane crime chart in five months akp

ताज्या बातम्या