दशकातील नीचांक ; यंदा जून महिन्यात ठाणे जिल्ह्यत सरासरीच्या ३२ टक्केच पाऊस; २०१४ मधील सर्वात कमी १४० मिमी पावसाच्या नोंदीशी बरोबरी

पावसाने ओढ दिल्याने ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमधील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे

rain
(संग्रहित छायाचित्र)

सागर नरेकर, लोकसत्ता

बदलापूर : गेल्या दोन दिवसांपासून मोसमी पावसाने ठाणे जिल्ह्यात काही भागांत दमदार हजेरी लावली असली तरी, यंदाच्या जून महिन्यातील पावसाची सरासरी दशकातील नीचांकी पातळीवर गणली जाणार आहे. यंदा २८ जूनपर्यंत ठाणे जिल्ह्यात १४० मिमी पावसाची नोंद झाली असून हे प्रमाण गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी पावसाच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. यंदा जूनमध्ये सरासरीच्या ३२ टक्के इतक्याच पावसाची नोंद झाली आहे.

पावसाने ओढ दिल्याने ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांमधील पाण्याची पातळी कमी होत चालली आहे. येत्या काही दिवसांत पाऊस आला नाही तर पाण्याची समस्या गंभीर होणार आहे. वेळ पडल्यास ऐन जुलै महिन्यात पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात दरवर्षी सरासरीच्या १६१ टक्के पाऊस पडतो, मात्र यंदा सुरुवातीलाच पावसाने नकारघंटा वाजवल्यामुळे जिल्ह्यासमोर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. यंदा जून महिन्यात नोंदवण्यात आलेला पाऊस गेल्या दहा वर्षांतील दुसरा नीचांकी पाऊस आहे. यापूर्वी २०१४ मध्ये जून महिन्यात १४० मिमी पावसाची नोंद झाली होत, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांमध्ये सरासरीच्या ४१ टक्के पाऊस पडला आहे. ठाणे जिल्ह्याला  पाणीपुरवठा करणारे बारवी धरण आणि भातसा हे दोन्ही धरणे या दोन तालुक्यात येतात. मात्र जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अवघा ३२ टक्के पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात गेल्या वर्षांत सरासरीपेक्षा दीडपट पाऊस पडला होता.

दशकातील नीचांक

पावसाची नोंद झाली होत, अशी माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील मुरबाड आणि शहापूर या दोन तालुक्यांमध्ये सरासरीच्या ४१ टक्के पाऊस पडला आहे. ठाणे जिल्ह्याला  पाणीपुरवठा करणारे बारवी धरण आणि भातसा हे दोन्ही धरणे या दोन तालुक्यात येतात. मात्र जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये अवघा ३२ टक्के पाऊस पडला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण जिल्ह्यात गेल्या वर्षांत सरासरीपेक्षा दीडपट पाऊस पडला होता.

पाऊस लांबण्याची कारणे

मान्सून पुढे सरकत असताना जेव्हा पश्चिम किनारपट्टीवर येतो तेव्हा बंगालच्या सागरात कमी दाबाचे पट्टे आवश्यक असतात. ते असल्याने वाऱ्याचा वेग प्रभावशाली असतो. यंदा वाऱ्यांना हा वेग नव्हता. ढग तयार होत होते पण ते किनाऱ्यावरून आत येत नव्हते. पश्चिमेचे वारे आवश्यक होते. या सर्व कारणांमुळे यंदाचा जून  महिना कोरडा गेला, असे अभिजीत मोडक यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane district received only 32 percent of average rainfall in june this year zws

Next Story
गणेशोत्सवासाठी १ हजार गाडय़ांचे नियोजन ; एसटीच्या संगणकीय आरक्षणास सुरुवात
फोटो गॅलरी