ठाणे : MSBSHSE 10th Result दहावीच्या परिक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून ठाणे जिल्ह्याचा निकाल यंदा ९३.६३ टक्के लागला आहे. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.९८ टक्के तर, मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.३८ टक्के इतके आहे. परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असली तरी निकालात मात्र मुलींनी बाजी मारल्याचे दिसून येत आहे. गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचा निकाल ९७.१३ टक्के इतका लागला होता. यंदा निकालात तीन टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून येत आहे.

ठाणे जिल्ह्यातील विविध भागातून यंदाच्या वर्षी ५७ हजार ३३९ मुले तर, ५३ हजार ८४३ मुली असे एकूण १ लाख ११ हजार १८२ विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. त्यापैकी १ लाख ४ हजार १०२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात मुलांची संख्या ५२ हजार ७४३ तर, ५१ हजार ३५९ मुलींची संख्या आहे. मुले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९१.९८ टक्के तर, मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५.३८ इतके आहे. यामुळे परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असली तरी मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त असल्याचे निकालातून दिसून येते.

Dam stock at 23 per cent four new dams nearing completion
धरणसाठा २३ टक्क्यांवर, नव्याने चार धरणे तळ गाठण्याच्या स्थितीत; सहा धरणांत २० टक्क्यांहून कमी पाणी
nashik water crisis marathi news, nashik water tankers marathi news
नाशिक जिल्ह्यात पाच लाख नागरिकांची टँकरवर भिस्त, लोकसभेच्या प्रचाराचा धुरळा अन प्रत्यक्षातील स्थितीत अंतर
More than 20 thousand farmers objected to MMRDA notification
‘एमएमआरडीए’च्या अधिसूचनेला २० हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या हरकती
Villager died in tiger attack
वाघाच्या हल्ल्यात गावकरी ठार, सहा वर्षांत ४२१ जण मृत्युमुखी

दरवर्षी निकालात होतेय घट

गेल्यावर्षी ठाणे जिल्ह्याचा दहावीच्या परिक्षेचा निकाल ९७.१३ टक्के इतका लागला होता. त्याच्या आधीच्यावर्षी जिल्ह्याचा निकाल ९९. २८ टक्के इतका निकाल लागला होता. त्यामुळे गेल्यावर्षी निकालात दोन टक्क्यांनी घट झाली होती. यंदाच्यावर्षी जिल्ह्याचा निकाल ९३.६३ टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा निकालात तीन टक्क्यांनी घट झाली आहे. दरवर्षी निकालात घट होताना दिसून येत आहे.

मिरा-भाईंदर आणि कल्याण ग्रामीण आघाडीवर

संपुर्ण ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्र आणि त्यापाठोपाठ कल्याण ग्रामीणमध्ये सर्वाधिक निकाल लागला आहे. मिरा-भाईंदरचा निकाल ९६.२२ टक्के तर, कल्याण ग्रामीणचा निकाल ९५.३४ टक्के इतका लागला आहे. सर्वात कमी निकाल भिवंडी तालुक्याचा लागला असून या तालुक्याचा निकाल ९० टक्के लागला आहे.

शहर निहाय निकाल टक्केवारीत

तालुक्याचे नाव          उत्तीर्ण मुले      उत्तीर्ण मुली     एकुण निकाल

कल्याण ग्रामीण          ९४.४८          ९६.३०          ९५.३४  

अंबरनाथ                 ९२.७४          ९५.६२          ९४.११

भिवंडी                    ८९.५५          ९४.५७          ९१.९६

मुरबाड                   ९१.६३          ९५.०७           ९३.३०

शहापूर                   ९१.६४          ९५.५२           ९३.५२ 

ठाणे महापालिका क्षेत्र   ९०.८३          ९४.११           ९२.४२

नवी मुंबई                ९४.०४          ९६.३२           ९५.१२ 

मीरा भाईंदर              ९५.२१          ९७.३३           ९६.२२

कल्याण डोंबिवली    ९३.८०      ९६.२४        ९४.९८

उल्हासनगर        ८८.७५      ९३.९१       ९१.३४

भिवंडी पालिका क्षेत्र  ८५.८९     ९४.०८       ९०.००

एकुण              ९१.९८     ९५.३८       ९३.६३