ठाणे – मुंब्रा शहरात सम्राट नगर परिसरात मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास नाल्याची सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सुदेैवाने कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
मुंब्रा येथे सम्राट नगर परिसरात असलेल्या एका नाल्याची सुरक्षा भिंत कोसळल्याची घटना घडली. ही सुरक्षा भिंत अंदाजे ४० फूट लांब आणि १० फूट उंच होती. या घटनेची माहिती मिळताच, ठाणे महापालिका मुंब्रा प्रभाग समितीतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंते आणि मुंब्रा प्रभाग समिती निहाय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
नाल्यात पडलेला भिंतीचा भाग मुंब्रा प्रभाग समितीच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काढण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. उर्वरित कार्यवाही संबंधित विभागामार्फत करण्यात येणार आहे.