ठाणे : मुंबई महापालिकेकडून ठाणे शहरात होणाऱ्या पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात लागू केली आहे. जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. यामुळे ठाण्यातील काही भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार असल्याने येथील नागरिकांवर पाणी टंचाईचे संकट ओढावल्याचे चित्र आहे.

ठाणे शहरात चार स्त्रोतांमार्फत दररोज ५९० दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २५० दशलक्ष लीटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १३५ दशलक्ष लीटर, स्टेम कंपनीकडून १२० दशलक्ष लीटर आणि मुंबई महापालिकेकडून ८५ दशलक्ष लीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यासाठी हे स्रोत महत्वाचे मानले जातात. मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाली आहे. हा जलसाठा अधिकाधिक काळ उपयोगात यावा, या उद्देशातून मुंबई महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी पाणी पुरवठ्यात ५ टक्के कपात लागू केली होती. या निर्णयामुळे मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला मिळणाऱ्या पाणी पुरवठात पाच टक्के कपात लागू झाली होती. त्यापाठोपाठ आता जलाशयांमधील पाणीसाठ्यात आणखी घट झाल्यामुळे मुंबई महापालिकेडून ठाणे शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्यात दहा टक्के कपात लागू केली आहे.

Mumbai, traffic, rain, Train,
मुंबई : पावसाचा जोर वाढल्याने वाहतूक सेवेवर परिणाम, कर्जत-चौक दरम्यान रेल्वे सेवा ठप्प
tree fell, pune, rain, pune print news,
पावसाचा फटका! पुण्यात ‘इतकी’ कोसळली झाडे!
Citizens of Ambazari Layout area questioned that an unauthorized statue near Ambazari Lake in Nagpur is not being demolished despite causing floods Nagpur
पुण्यात अनधिकृत बांधकामावर हातोडा, नागपुरात वेगळा न्याय का ?
Excavation of Wadala to Paral water tunnel completed by Mumbai Municipal Corporation
मुंबई महानगरपालिकेतर्फे जलबोगद्यांचा विक्रम… न्यूयॉर्कपाठोपाठ सर्वांत मोठे जाळे… पण यातून पाणी प्रश्न सुटणार का?
MUMBAI Roadside underground drains marathi news
मुंबई: रस्त्याच्या कडेच्या भूमिगत गटारांची सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे पाहणी करणार
mumbai drainage silt
मुंबईतील नाल्यांतून उद्दिष्टापेक्षा अधिक गाळ उपसा, पालिका प्रशासनाचा दावा; वडाळ्यामधील नाल्यातील तरंगता कचरा पुन्हा काढणार
mumbai mulund latest marathi news
मुलुंडमधील १७ इमारती टँकरच्या पाण्यावर अवलंबून, कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने रहिवासी हैराण
mumbai water supply dams 5 percent Capacity, Low Rainfall in dam area, Water Shortage Concerns for Mumbai, Low Rainfall in mumbai water suuply dams, Mumbai news, water news
मुंबई : धरण क्षेत्रात पावसाची ओढ कायम, केवळ ५.३२ टक्के पाणीसाठा शिल्लक

हेही वाचा…कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीला बिअर पाजून लैंगिक अत्याचार

मुंबई महापालिकेकडून ठाणे शहराला ८५ दशलक्ष लीटर इतके पाणी दररोज मिळते. या पाण्याचा पुरवठा ठाणे शहरातील नौपाडा, पाचपाखाडी, हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथ नगर, नामदेव वाडी, साईनाथ नगर, रामचंद्र नगर १, किसन नगर नं १, किसन नगर नं २, शिवाजी नगर, पडवळ नगर, जनता झोपडपट्टी, शिवशक्ती नगर, करवालो नगर, अंबिका नगर, ज्ञानेश्वर नगर, जय भवानी नगर, काजुवाडी, जिजामाता नगर, बाळकुम पाडा नं १, लक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, मानपाडा (नळपाडा), कोपरी धोबीघाट, गावदेवी (लुईसवाडी) जलकुंभ, टेकडी बंगला जलकुंभ, भटवाडी, इंदिरानगर, आनंद नगर, गांधी नगर, कोपरी कन्हैया नगर या परिसरात केला जातो. याच भागात आता १० टक्के पाणी कपात लागू झाली असून यामुळे येथील नागरिकांपुढे पाणी संकट उभे राहिले आहे. या पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने वापर करून ठाणे महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.