scorecardresearch

ठाणे : महिला पोलीस कर्मचाऱ्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या

श्रीनगर पोलीस ठाण्यात वाव्हळ कार्यरत होत्या.

ठाणे : महिला पोलीस कर्मचाऱ्याची पोलीस ठाण्यात आत्महत्या
( संग्रहित छायचित्र )

श्रीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेली महिला पोलीस नाईक अनिता वाव्हळ यांनी पोलीस ठाण्यातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी उघडकीस आला आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

श्रीनगर पोलीस ठाण्यात वाव्हळ कार्यरत होत्या. मंगळवारी दुपारी त्यांनी पोलीस ठाण्यातील महिला कक्षामध्ये जाऊन गळफास घेतला. गळफास घेतला तेव्हा महिला कक्षात कोणीही नव्हते. एक पोलीस कर्मचारी महिला कक्षात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. वाव्हळ यांच्याजवळ कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane female police officer commits suicide in police station amy

ताज्या बातम्या