ठाणे : होळीच्या दिवशी पाण्याने भरलेली पिशवी फेकून मारल्याचा जाब विचारल्याने एकावर चाकू हल्ला केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नरेश कनोजीया (२१) असे हल्लेखोराचे नाव असून त्याच्याविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोलशेत जवळील आझादनगर भागात मिथीलेश राऊत (१९) हा जखमी मुलगा वास्तव्यास आहे. होळीच्या दिवशी मिथीलेश हा परिसरात उभा असताना नरेश याने त्याच्या अंगावर पाण्याने भरलेली पिशवी फेकून मारली. मिथीलेश याने त्यास पाण्याने भरलेली पिशवी फेकू नको अशी विनंती केली. या कारणावरुन दोघांमध्ये वाद झाला. नरेश याच्याकडे चाकू होता. त्याने मिथीलेश याच्यावर चाकूने वार केला. मिथीलेश याचा मित्र त्याच्या बचावासाठी आल्यानंतर त्याने तात्काळ त्याला उपाचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार झाल्यानंतर मंगळवारी त्याने कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे.