ठाण्यात नर्सरी शिक्षिकेची गळफास लावून आत्महत्या

आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

ठाण्याच्या पाचपाखडी परिसरातील टेकडीबाग परिसरात राहणाऱ्या श्रद्धा लाड या नर्सरी चालवणाऱ्या शिक्षिकेने राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली.

ठाण्याच्या पाचपाखडी परिसरातील टेकडीबाग परिसरात राहणाऱ्या श्रद्धा लाड या नर्सरी चालवणाऱ्या शिक्षिकेने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. घटनास्थळी नौपाडा पोलीस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

अधिक माहिती अशी, टेकडीबंगला येथील स्नेहलक्ष्मी इमारतीत पती आणि तीन मुलांसह राहणाऱ्या श्रद्धा लाड या नर्सरी चालवतात होती. गेल्या १२ वर्षांपासून त्या हा व्यवसाय करतात. त्यांचे पती हे कामानिमित्त बाहेरगावी असतात. श्रद्धा लाड यांच्या घरी कोणीच नव्हते त्यामुळे त्यांनी आत्महत्या कधी केली हे समजले नाही. शनिवारी रात्री या घटनेचा उलगडा झाला. आत्महत्ये मागच्या कारणांचा नौपाडा पोलीस शोध घेत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thane lady nursery teacher commits suicide