ठाणे – लोकतंत्र बचाव पदयात्राचे आयोजन रविवारी सकाळी भाजप – महायुतीच्या वतीने ठाण्यात करण्यात आले आहे. या पदयात्रेसाठी महापालिका परिसर, खोपट भागात ठिकठिकाणी वाहतूक बंद केली आहे. त्याचा परिणाम नागरिकांना सहन करावा लागला आहे.

लोकतंत्र बचाव यात्रेसाठी ठाण्यातील पाचपाखाडी येथील ठाणे महापालिका मुख्यालयाजवळ मंच उभारण्यात आला आहे. सकाळी 9 वाजल्यापासून भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी रस्ते बंद केले होते. याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला. नागरिकांना वाहतूक करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असून पर्यायी मार्गनवरून त्यांना प्रवास करावा लागला.