Thane Mahapor Varsha Marathon Traffic Diversions: रविवारी ठाण्यात महापौर वर्षा मॅरेथॉनचा उत्साह असला तरी शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहनचालकांची कोंडी होण्याची शक्यता आहे. नितीन जंक्शन, टीएमसी सर्कल, कॅडबरी जंक्शन, तीन हात नाका, अल्मेडा सिग्नल, कामगार नाका, बिरसा मुंडा चौक, टेंभी नाका यांसह विविध मार्गांवर प्रवेश बंद तसेच वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे मॅरेथॉनच्या दिवशी नेमके कोणते मार्ग बंद असतील आणि वाहनचालकांना कोणत्या पर्यायी मार्गाने जाता येईल, हे जाणून घेऊया.

ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या पार्श्वभूमीवर रविवारी, ३० ऑगस्टला शहरातील अनेक प्रमुख मार्गांवरील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. धावपटूंची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक विभागाने अधिसूचना जारी केली असून, २९ ऑगस्ट रात्री ९ वाजल्यापासून ३० ऑगस्ट दुपारी ४ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. त्यामुळे ठाणेकरांनी घराबाहेर पडण्यापूर्वी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.

असे आहेत वाहतूक बदल

प्रवेश बंद – नितीन कंपनी कडुन टिएमसी सर्कल कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना नितीन जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग- सदरची वाहने ही कॅडबरी जंक्शन खोपट तसेच तिनहात नाका हरीनिवास सर्कल मार्गे इच्छितस्थळी जातील.

प्रवेश बंद – ठाणे वैभव चौक अल्मेडा सिग्नलकडून टिएमसी सर्कल कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनाना प्रवेश बंद करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – सदरची वाहने ही सरळ वंदना डेपो, खोपट मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – नितीन सर्व्हिस रोडने धर्मविर कट/तिनहात नाक्या कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनाना नितीन जंक्शन येथे प्रवेश बंद” करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग- सदरची सर्व वाहने ही नाशिक मुबई हायवे स्लिप रोडने इन्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – धर्मविर मार्गावरुन आधार हॉस्पीटल मार्गे धर्मविर कट कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनाना धर्मविर कट येथे ”प्रवेश बंद” करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – सदरची वाहने ही परमार्थ निकेतन येथुन इच्छित स्थळी जातील

प्रवेश बंद – कौशल्या हॉस्पीटल कडुन कौशल्या कट कडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनाना कौशल्या कट येथे ”प्रवेश बंद” करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – सदरची वाहने ही सर्व्हिस रोडने कॅडबरी – खापर मार्ग इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – सतरज वेफर्स ते टि एम सी सर्कल कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सतरंज वेफर्स येथे ”प्रवेश बंद” करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग- सदरची वाहने होटेल तंबी समोरून उजवे वळण आराधना मार्गे किंवा सतरज वेफर्स समोरून सर्व्हिस रोड मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – हस नगर मुरी बाबा दर्गा येथुन टि.एम.सी. सर्कल कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनाना नुरी बाबा दर्गा कट येथे ”प्रवेश बंद” करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग- सदरची वाहने अल्मेडा सिग्नल तसेच एसटी वर्कशॉप रोड मार्गे इच्छित स्थळी जातील

प्रवेश बंद – ज्ञानेश्वर नगर व आबेवाडी कडुन कामगारनाका येथून यशोधननगर कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कामगारनाका कट येथे ”प्रवेश बंद” करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – सदरची वाहने ही कामगार नाका येथून सरळ जावून इंदिरानगर नाका येथून उजवीकडे वळून पुढे इच्छीत स्थळी जातील

प्रवेश बंद – यशोधन नगर परीसरातील व लोकामान्यनगर कडून कामगार नाका कड़े जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनाना यशोधन नगर चौक येथे ”प्रवेश बंद” करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग- सदरची वाहने ही यशोधनगर चौकातून – लोकमान्य नगर बस डेपो येथून डावीकडे वळुन इंदिरानगर नाका येथुन पुढे इच्छीत स्थळी जातील

प्रवेश बंद – आई माता चौक परीसरातील व वर्तकनगर कडील सर्व प्रकारची वाहने ही आई यशोधननगर कड़े जाणारी सर्व वाहनांना आईमाता चौक येथे ”प्रवेश बंद” करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – ही वाहने आईमाता बौकातून पुढे इच्छीत स्थळी जातील.

प्रवेश बंद – गोल्डन नाका हनुमान मंदिरा कडुन फ्लॉवर व्हॉली मार्गे कॅडबरी कडे जाणाऱ्या सेवा रस्ता सर्व वाहनाना हनुमान मंदिर येथे ”प्रवेश बंद” करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – सदरची वाहने ही सरळ पुढे जावुन गोल्डन क्रॉस येथे डावे बाजुस वळण घेवुन स्लिप रोडने नाशिक मुंबई महामार्गावरून इच्छीत स्थळी जातील.

प्रवेश बंद – बिरसा मुंडा चौकाकडुन गांधी नगर कडे जाणाऱ्या सर्व वाहनाना बिरसा मुंडा चौक येथे ”प्रवेश बंद” करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – गांधीनगर चौकाकडे जाणारे वाहनांसाठी गाधीनगर कडुन बिरसा मुडा चौकाकडे येणारी वाहीनी दुहेरी करण्यात येत असून सदर वाहीनी वरुन इच्छीत स्थळी जातील.

प्रवेश बंद – गांधी नगर नौकाकडुन बिरसा मुडा चौकाकडे जाणान्यया सर्व प्रकारच्या वाहनाना गांधीनगर चौक येथे ”प्रवेश बंद” करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग – या मार्गावरुन गांधीनगर चौकाकडे जाणारे वाहनासाठी बिरसा मुंडा चौक कडुन गांधी नगर चौकाकडे येणारी वाहीनी दुहेरी करण्यात येत असून सदर वाहीनी वरुन इच्छीत स्थळी जातील

प्रवेश बंद – क्रिक नाक्याकडून जी पीओ खोपट, मिनाताई ठाकरे चौक कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनाना क्रिक नाका येथे ”प्रवेश बंद” करण्यात येत आहे. पर्यायी मार्ग – ही वाहने किक राका, राबोडी वाहतूक उप विभाग महालक्ष्मी येथून पुढे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – जांभळी नाका, टेंभी नाका, सिव्हील कॉर्नर खोपट, मिनाताई ठाकरे चौक कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना

टेंभी नाका येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग – ठाणे स्टेशन येथून येणाऱ्या टिएमाटी व एन एम एम टी. व्या बसेस हया नितीन कंपनी मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच जांभळी नाका, टेंभी नाका, सिव्हील कॉर्नर खोपट, मिनाताई ठाकरे चौक कडे जाणारी वाहने टेंभी नाका येथुन कोर्टनाका मार्गे जावुन पुढे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – बिरसा मुंडा चौकातून पवारनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर सर्व वाहनांना बिरसा मुंडा चौक येथे ”प्रवेश बंद” करण्यात येत आहे.पर्यायी मार्ग – बिरसा मुंडा चौकातुन पवारनगरच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी पवार नगरकडून बिरसामुंडा चौककडे येणारी वाहिनी दुहेरी करण्यात येत असून सदर वाहिनी वरून इच्छित स्थळी जातील.

वाहने उभी करण्यास मनाई

– कॅडबरी जक्शन, नितीन जक्शन, तिनहात नाकापर्यंत सर्व्हिस रोडवर दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.

– तिनहात नाका ते तिन पेट्रोलपंप पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे. – घड्याळ नाका डॉमिनोज पिझा ते हॉटेल तत्री सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे – सतरंज वेफर्स मदनलाल धिगरा मार्ग ते टिएमसी सर्कल सर्व प्रकारच्या वाहनाना दोन्ही बाजूस पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे – अल्मेडा सिग्नल ते टिएमसी सर्कल सर्व प्रकारच्या वाहनाना पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.

येवले चहा ते दगडी शाळा पर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.

दगडी शाळा ते मालतीबाई हॉस्पीटल दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांना पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे – मॉडेला चेक नाका, रोड नं.१६, २२, साठेनगर चौक, इंदिरा नगर नाका, कामगार नगर नाका, आर.जे. ठाकुर कॉलेज, यशोधन नगर, आईमाता चौक, शास्त्रीनगर रोडवर एका बाजूला वाहने पार्कीग करण्यास मनाई करण्यात येत आहे. – आरजे ठाकुर कॉलेज कट ते महात्त्मा फुले नगर ते आईमाचा चौकाकडे जाणाऱ्या रोडच्या तसेच नितिन जंक्शन सर्व्हिस रोड ते कॅडबरी जंक्शनकडे जाणाऱ्या रोडच्या दोन्ही बाजुस वाहने पार्कीग करण्यास मनाई करण्यात येत आहे.