ठाणे : ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनस्पर्धेत पुरुष गटात कोल्हापूरचा प्रविण कांबळे याने अव्वल स्थान पटकावले. त्याने १ तास ७ मिनिटे आणि २१ सेकंदासह २१ किमीचे अंतर पार केले. तर, महिला गटात नाशिकची रविना गायकवाड हिने १ तास २६ मिनिटे आणि ४ सेकंद या वेळेत शर्यत पूर्ण केली. या स्पर्धेत सुमारे ३० हजार स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.
ठाण्यात रविवार सकाळी ३२ व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथाॅनचे आयोजन करण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरुष गटाच्या तर त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महिला गटाच्या स्पर्धेला झेंडा दाखवला. त्यानंतर, टप्प्याटप्याने एकूण १४ गटातील स्पर्धांचा शुभारंभ महापालिका मुख्यालयासमोरील चौकातून करण्यात आला. ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या स्पर्धेत महिला आणि पुरुष गटात ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. त्याचबरोबर, दिव्यांगांच्या त्रिदल समुहानेही या मॅरेथॉनमध्ये विशेष सहभाग घेतला. महापालिका अधिकारी कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यासाठी एक किमीची ”कॉर्पोरेट रन” ठेवण्यात आली होती. या स्पर्धेत महापालिका अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांनी सहभाग घेतला.
चित्रपटसृष्टीतील मंगेश देसाई, गश्मीर महाजनी किशारी आंबिये, ऐश्वर्या नारकर, अभिज्ञा भावे, हरिश थोरात, स्वराज नागांवकर, शिवानी सोनार, विजया बाबर, निखिल दामले, रोहित परशुराम, ट्विंकल यादव, दक्षता जुईल, अनुज साळुंखे, प्रतिक्षा शिवणकर, तनुष्का विशेल, चेतन गौरव, समीर परांजपे, अनघा ठाकूर उपस्थित होते. कलाकारांनी देखील स्पर्धकांचा उत्साह वाढवत एक कि.मी स्पर्धेत सहभाग घेतला.
– विविध १४ गटात झालेल्या या स्पर्धेत विजेत्यांना ११ लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात आली. २१ कि.मी स्पर्धेतील विजेत्यास एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक, सन्माचिन्ह, पदक आणि प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
पुरुष खुला गट – अंतर २१ किमी
१. प्रविण कांबळे, कोल्हापूर २. राजन विक्रमजीत यादव, पुणे ३. कालिदास हिरवे, नाशिक ४. अमित पाटील
५. तन्मय पवार ६. पराजीत गायकवाड ७. रुपनेर चैतन्य ८. राज तिवारी ९. अंकुश हक्के १०. कमलाकर देशमुख
महिला खुला गट – अंतर २१ किमी
१. रविना गायकवाड, नाशिक २. तेजस्विनी नरेंद्र लामकाने ३.साक्षी कसबे, पुणे ४. आचल कडुकर ५. यामिनी ठाकरे ६. साक्षी पवार ७. मनिषा पवार ८. अर्चना शेप ९. पायल विश्वकर्मा १०. रुख्मिणी भोर
पुरुष, १८ वर्षावरील, १० किमी
१. अभिनंदन सुर्यवंशी २. अतुल ३. सोहम शिंदे ४. करिहरपाल कार्तिक कुमार ५. दाजी हुबले ६. ईश्वर झिरवाळ ७. अजय पाल ८. पुंडलिक गवळी ९. विशाल बनसोडे १०. रोशन रहाटे
महिला, १६ वर्षावरील, १० किमी
१. तृप्ती नागरकर २. प्रतिक्षा राज ३. गौरी राऊत ४. प्रिया भोर ५. सुजाता मुंडेकर ६. श्वेता गावडे ७. विश्वेश्वरी न्हावी ८. दिशा वाघ ९. स्वरुपा पाटील १०. डॉ. संजना पाटील
*मुले, १८ वर्षाखालील, १० किमी*
१. विवेककुमार शाह, जे.एस. डब्ल्यू स्पोटर्स, वासिंद २. पवन गौड, इंदिरा गांधी स्कूल, ठाणे ३. प्रियांशु आत्माराम जैसवाल, जे.एस.डब्ल्यू स्पोटर्स, वासिंद ४. रोहित संगा पॉल, साकेत कॉलेज, कल्याण ५. आदित्य ध्रुवराज यादव, ठाकूर कॉलेज, कांदिवली ६. प्रिस रामसरन जैसवार, आर.जे. ठाकूर, ठाणे ७. अुनप संजय प्रजापती, सी.एच.कॉलेज, उल्हासनगर ८. आदित्य शामसुंदर प्रजापती, सतिश प्रधान ज्ञानसाधन कॉलेज, ठाणे ९. कृष्णा किशोर जाधव, अभिनव ज्ञानमंदिर कॉलेज, कर्जत १०. अभिषेक अमरजित यादव, बी.एन. कॉलेज, भिवंडी
*मुले, १५ वर्षाखालील, ०५ किमी*
१. अयान वि. पिंजारी, रेम्बो स्पोटर्स ॲकॅडमी, अंबरनाथ २. विनायक विजय यादव, कु.ब.न.प. शाळा क्र. 15 एरंजाड ३. युवराज तरणे, जे.एस.डब्ल्यु स्पोटर्स, वाशिंद ४. सुयश भीमा हेमाडे, कु.ब.न.प.शाळा क्र. 15 एरंजाड ५. अमन गोपाल गुप्ता, न.मु.म.पा.शाळा क्र. 104 ६. शशांक न. उपाध्ये, रेम्बो स्पोटर्स अकॅडमी ७. कयान दिपक चौहान, राजे स्पोटर्स ॲकॅडमी, बदलापूर ८. प्रशांत विजय राणे, कु.ब.न.प. शाळा क्र. 15 एरंजाड ९. महाकेश पाल, रेम्बो स्पोटर्स अकॅडमी, अंबरनाथ १०. आराध्य सुहास पाटील, सेव्हन स्टार स्पोटर्स अकादमी
मुली, १५ वर्षाखालील, ०५ किमी
१. करिश्मा अशोक राणे, कु.ब.न.प शाळा क्र. 15, बदलापूर २. वंदना ठाकूर, जे.एस.डब्ल्यू, वाशिम ३. समीक्षा रोहिदास भोपी, कु.ब.न.प शाळा, बदलापूर ४. अक्षरा किरण पाटील, सेवा संयो ५. क्तैया ओझा, जे.एस. स्पोटर्स ६. जान्वी संतोष शेलार, कु.ब.न.प शाळा, बदलापूर ७. ईशा चंद्रकांत चव्हाण, कु.ब.न.प शाळा, बदलापूर ८. धनक्ती शशिकांत पष्टे, कु.ब.न.प शाळा, बदलापूर ९. भुमिका रमेश चव्हाण, कु.ब.न.प शाळा, बदलापूर १०. अल्पीता शंकर चव्हाण, कु.ब.न.प शाळा, बदलापूर
मुले, १२ वर्षाखालील, ०३ किमी
१. तेजप्रताप कुमार यादव, मध्य रेल्वे उच्चतर माध्य. विद्यालय कल्याण २. रिदम निखिल साहिल, राजे स्पोटर्स ३. रोनक मंगेश आगळे, कु.ब.न.प शाळा 15, एरंजाड ४. तेजीतकुमार कमलेशकुमार यादव, सेंट्रल रेल्वे ५. रुद्र रणजीत सिंग, अंबरनाथ कला क्रीडा भारती अंबरनाथ ६. वेद विवेकप्रकाश गुप्ता, मध्य रेल्वे उच्चतर माध्यमिक विद्यालय कल्याण ७. क्षितीज बाबुरात कोरवी, रन होलीस ८. आयान नरेंद्र पांडे, रीमो स्पोम ९. रुद्र ओमप्रकाश यादव, राजे स्पोटर्स १०. ऋतुराज वाल्मिक सोनावणे, डॉन बॉस्को स्कूल कल्याण
मुली, १२ वर्षाखालील, ०३ किमी
१. रिध्दी राजन देशमुख, राजे स्पोर्टस ॲकडमी बदलापूर २. गार्गी मनोज भोईर, मोहिंदरसिंग काबलसिंग हायस्कुल ३. कितिका किशोर सावंत, राजे स्पोर्टस ॲकडमी बदलापूर ४. काव्या रोशन देशमुख, राजे स्पोर्टस ॲकडमी बदलापूर ५. सिध्दी राजन देशमुख , राजे स्पोर्टस ॲकडमी बदलापूर ६. आहाना सुरेश निरंकार, रेन्बो स्पोर्टस अकॅडमी ७. श्रावणी दिनेश शेलार, जे. एस.डब्ल्यू स्पोटर्स ८. अनन्या राजेशकुमार प्रसाद, रेम्बो स्पोटर्स अकॅडमी ९. रिया हेमंत गोसावी, अंबरनाथ कला क्रीडा भारती, अंबरनाथ १०. अनन्या राजेशकुमार प्रसाद, अंबरनाथ कला क्रीडा भारती, अंबरनाथ
पुरुष – ६० वर्षांवरील, ०१ किमी
१. प्रभाकर यमनाजी डुंबरे २. विष्णुदास रामभाऊ आवटे ३. सुधाकर परशुराम शिंदे ४. वाल्मिक सदोबा मांढरे ५. एकनाथ रघुनाथ पाटील
महिला – ६० वर्षांवरील, ०१ किमी
१. आशा किशोर पाटील २. पुर्णिदेवी रमेश शर्मा ३. रेखा विलास ताम्हाणेकर ४. अंजली प्रदीप पांडे ५. उर्मिला दत्तात्रय तवटे
ठाणे महानगरपालिका कर्मचारी वर्ग 3 कि.मी (पुरूष)
1. राजेंद्र प्रल्हाद नांगरे (TDRF जवान) 2. गणेश भोये 3. तुषार दवणे 4. तानाजी भरसट 5. अंकुश पवार
ठाणे महानगरपालिका कर्मचारी वर्ग 3 कि.मी (महिला) 1. अंकिता मोरे 2. स्मिता काजळे 3. प्रिती राठोड 4. स्मिता महाजन 5. संध्या पांडे
कॉर्पोरेट रन, अंतर ०१ किमी
१. मारुती राजू लांडे २. कुणाल विक्रांत भोईटे ३. दिलीप शांताराम शिंदे ४. सौरभ राजीव डाके ५. निखिल मनोहर चव्हाण
