badlapur protest : ठाणे : बदलापुरातील दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ मंगळवारी बदलापूर रेल्वे स्थानकात तब्बल नऊ ते दहा तास रेल रोको आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये पोलिसांवर दगडफेक देखील करण्यात आली होती. यातील सहभागी आंदोलकांचा कोणत्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का हे तपासण्यात येणार आहे. पोलिसांनी केलेल्या व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या आधारे याचा शोध घेण्यात येईल आणि त्यांचा कोणाकोणाशी संबंध आहे हे सर्व तत्थ्य लवकरच बाहेर येईल, अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. तसेच या प्रकरणात दिरंगाई केलेले पोलीस अधिकारी आणि शाळा प्रशासनातील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली असल्याचेही देसाई यांनी सांगितले.

बदलापूर येथील आदर्श शाळेत झालेल्या दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाऱ्याच्या विरुद्ध बदलापूर मध्ये मंगळवारी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि रेल्वे स्थानकात रेल रोको करणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक देखील केली. यासर्व प्रकरणानंतर आज जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज बदलापूरला भेट देत पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडी वाढविण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हा आरोपी खासगी कर्मचारी होता. शाळेने नियुक्त केलेला कर्मचारी नसल्याचे सांगत, कॉलेज, हॉस्टेल येथे खासगी कर्मचारी यांची नेमणूक करताना त्याचे पोलीस पडताळणी सादर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

trade stop due to the closure of the market committees in West varhad
अकोला: बाजार समित्या बंद! कोट्यवधींचे व्यवहार ठप्प…
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
Onion and grain trade stopped due to market committee strike nashik
कांद्यासह धान्याचे व्यवहार ठप्प; बाजार समिती संपामुळे कोट्यवधींची उलाढाल ठप्प
Bhoomipujan municipal development works Mumbai,
मुंबई : आचारसंहितेपूर्वी महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी कार्यक्रमांचा धडाका
Badlapur accused police custody, Badlapur accused,
गुन्ह्याच्या अधिकच्या तपासासाठी बदलापूर आरोपींचा पोलिसांकडे ताबा
nitin gadkari
नागपूर:‘लोकसभा’ जिंकण्यासाठी गडकरींनी केला होता ‘हा’ नवस…
Ladki bahin yojana BJP workers meeting Marathwada
‘लाडक्या बहिणीं’चे भाजपकडून तीन हजार मेळावे
badlapur school girl rape case marathi news
बदलापूर: ‘त्या’ माध्यम प्रतिनिधीला जामीन मंजूर, वकील संघटनांचा पुढाकार, अन्य आरोपींनाही जामीन

हेही वाचा…Badlapur Protest : बदलापूर आंदोलनप्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, ४० आंदोलक अटकेत, ३०० जणांविरोधात गुन्हा दाखल

तर शाळेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले नाहीत, हा शाळेचा हलगर्जीपणा आहे. यामुळे शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तातडीने यांचे निलंबन करण्यात आले आहे. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला जाणार आहे. आयपीएस अधिकारी आर. पी. सिंग यांची एस आय. टी. प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या देखरेखीखाली या सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. सर्व बाबी न्यायालयासमोर मांडण्यात येणार आहेत. या आरोपीने या अगोदर आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास चालू आहे असे सांगत आरोपीला शंभर टक्के फाशी होणार असे देखील पालकमंत्री देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा…Badlapur Crime : “माझ्या मुलाला सोडा, मला..” बदलापूर आंदोलनातल्या मुलाला अटक होताच आईचा आक्रोश

आंदोलनाच्या मागे कोण ?

बदलापूर रेल्वे स्थानकात केलेल्या रेल रोको मध्ये विद्यार्थी व जेष्ठ नागरिकांचे खूप हाल झाले. रेल्वे आंदोलनामध्ये बदलापूरचे स्थानिक लोक नव्हती. त्यांच्या हातात “मुख्यमंत्री-लाडकी बहीण” योजनेचे बॅनर होते. त्यामुळे या आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांकडे आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांचे व्हिडिओ आहेत.पोलीस व्हिडिओ पाहून गुन्हे दाखल करीत आहेत. प्रशासनाने संयम काय असतो ते दाखवून दिले. रेल्वे प्रवाशांचे खूप हाल होत होते म्हणून जमाव पांगविण्यात आला. असे स्पष्टीकरण पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. तर पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या व्यक्तींचा शोध सुरू असून त्यांच्यावर देखील योग्य ती कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.