ठाणे येथील बारा बंगला परिसरातील ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या शासकीय निवासस्थानत पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचे उघड होताच, ठाणे महापालिकेने कोपरी परिसरात ५ फेब्रुवारीपर्यंत चिकन, मटन विक्री दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. बर्ड फ्लूचा संसर्ग रोखण्यासाठी पालिकेने ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ही उपाययोजना केली आहे.

ठाणे येथील बारा बंगला परिसरातील ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे शासकिय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना २० बर्ड फ्लूची लागण झाल्याचे गेल्या आठवड्यात समोर आले होते. यानंतर जिल्हा पशू संवर्धन विभागाने बंगल्याच्या एक किलोमिटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे काम केले होते. तसेच परिसरात बर्ड फ्लुचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कृती आराखड्यानुसार उपाययोजना करण्यास सुरूवात केली होती. यानुसार पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली भरारी पथक तयार करण्यात आले. या पथकांमध्ये राज्याचा पशुसंवर्धन विभाग, ठाणे महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या भागातील कोंबडी आणि इतर पाळीव पक्षांचे नुमनेही तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात काहीच आढळून आलेले नाही. तसेच या पथकाने १२७ नागरिकांची आरोग्य तपासणी करून ७५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी घेतले होते.

issue of Illegal garbage dump at Gaimukh area
गायमुख परिसरात बेकायदा कचराभुमी ? राष्ट्रीय हरित लवादाने बजावली पालिकेला नोटीस, महिनाभरात स्पष्टीकरण देण्याचे आदेश
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Finance Minister Ajit Pawar
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंच्या काळातील शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा योजना बंद होणार? कारण काय?
26 highly dangerous buildings in Thane are occupied by residents municipality issued notices four months in advance
ठाण्यात २६ अतिधोकादायक इमारती रहिवास व्याप्त, चार महिने आधीच खबरदारी घेत पालिकेने बजावल्या नोटीसा
चिरनेरमधील बर्डफ्लूची साथ आटोक्यात आल्याचा पशुधन विभागाचा दावा, चिकन आणि अंडी शिजवून खाण्याचेही नागरिकांना आवाहन
diy mosquito repellent
आता विसरा डासांचा त्रास! दिवसेंदिवस वाढणाऱ्या डासांचा ‘या’ सोप्या आणि स्वस्त घरगुती उपायांनी करा नायनाट
No bird flu death reported in Dhule but 27 Rapid Response Teams activated precaution
धुळ्यात ‘बर्ड फ्लू’ प्रादूर्भावापूर्वीच २७ पथके तैनात, कुक्कुट व्यावसायिकांना सूचना
Thousands of foreign birds arrived in Uran with flamingos moving due to Water bodies dried
उरणमध्ये फ्लेमिंगो नव्या पाणथळींच्या शोधात

हेही वाचा >>>कल्याणमधील वालधुनी येथील रेल्वेच्या जागेवरील शाळेला कारवाईची नोटीस; २८ जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याची सूचना

त्यात काही आढळून आलेले नाही. दरम्यान, बर्ड फ्लु प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून कोपरी परिसरातील चिकन आणि अंडी विक्री दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार ठाणे महापालिकेने कोपरी परिसरातील चिकन आणि अंडी विक्री दुकानदारांना नोटीस बजावून ५ फेब्रुवारीपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या वृत्तास ठाणे महापालिका मुख्य आरोग्य अधिकारी डाॅ. चेतना नितील के यांनी दुजोरा दिला आहे. दुकाने बंद ठेवल्यामुळे आर्थिक नुकसान होत असून दुकानांचे भाडे कसे द्यायचे असा प्रश्न आमच्या पुढे उभा राहिला असल्याची प्रतिक्रिया दुकानदारांकडून उमटत आहे.

Story img Loader