ठाण्यातील स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात ठाणे महानगरपालिकेने नुकतेच ३४ व्या वर्षांत पदार्पण केले. या वर्धापन दिनानिमित्त ठाणे महापालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हा वर्धापन दिन केवळ मुख्यालयापर्यंतच मर्यादित न राहता महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या विविध प्रभाग समित्या, मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण केंद्र आदी विविध खात्यातील कर्मचाऱ्यांनी वर्धापन दिनी आपली कला गडकरी रंगायतन येथे सादर केली. ठाणे महापालिका वर्धापन दिन, महिला दिन, ज्येष्ठ नागरिक दिन, ठाणे महापौर वर्षां मॅरेथॉन, ठाणे कला क्रीडा महोत्सव तसेच विविध ठाणे महापौर चषक स्पर्धा घेणारी सर्व महापालिकांमधील ठाणे ही एकमेव महापालिका असावी.

सांस्कृतिक उपराजधानी अशी ठाण्याची ओळख आहे, ही ओळख वर्षभर विविध कार्यक्रम राबवून ठाणे महापालिकेने सार्थ ठरविली आहे. काही वर्षांपासून या वर्धापन दिनी आपल्या अंगभूत कलागुणांना वाव देण्याचे काम कर्मचारी करत आहेत, किंबहुना कर्मचाऱ्यांनाही आपली कला सादर करता यावी यासाठी त्यांना रंगमंच उपलब्ध करून देण्याचे कामही पालिका प्रशासन करीत आहे. एरव्ही आपल्या कामात असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेनंतर

Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…
devendra fadnavis said maha vikas and india aghadi are break engine public do not trust
इंडिया आघाडी म्हणजे तुटलेले इंजिन, देवेंद्र फडणवीसांनी उडवली खिल्ली…..
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी

कार्यक्रमाचा सराव करून सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्तमरीत्या सादर केले. वर्षभर विविध क्रीडा स्पर्धा घेणाऱ्या दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहातील कलाकारांनी जय मल्हार या मालिकेचे टायटल साँग सादर करून अक्षरश: उपस्थितांची मने जिंकली. वन्समोअर, टाळया, शिट्टया मिळवीत या कलाकारांना लोकप्रतिनिधींनीही मनसोक्त दाद देत बक्षिसांचा वर्षांव केला. रुग्णसेवेचा वसा घेवून परिचारिकेचे शिक्षण घेता घेता अर्ध वेळ परिचारिकेचे काम करणाऱ्या महापालिकेच्या मीनाताई ठाकरे परिचर्या प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमालाही वन्समोअरची दाद मिळाली. नृत्याबरोबर नाटिकाही सादर करण्यात आल्या. या सर्वावर कळस म्हणून की काय, कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या गाण्यांचा आस्वादही रसिकांनी लुटला. कर्मचाऱ्यांबरोबर अधिकाऱ्यांनीही आपल्यातील कला सादर करून रसिकांना तृप्त केले.

नागरिकांना नागरी सोयीसुविधा पुरविण्यात तसेच नागरिकांसाठी विविध उपक्रम तसेच विविध सेवा देण्यास नेहमीच अधिकारी, कर्मचारी हे अग्रेसर असतात. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांनाही आपली कला सादर करण्यासाठी प्रशासनाचा नेहमीच पुढाकार असतो याचा प्रत्यय वर्धापन दिनी सर्वानाच मिळाला. वर्धापन दिन हा केवळ कर्मचाऱ्यांपुरताच मर्यादित न राहता ठाण्यातील कर्तृत्वान नागरिकांना ठाणे भूषण, ठाणे गौरव, ठाणे गुणीजन व क्रीडापटूंना विशेष पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. स्मार्टसिटीच्या दिशेने महापालिकेने आपले

पाऊल उचलले आहे, तसेच नुकतेच महाराष्ट्रातील पाच शहरांमध्ये ठाणे महापालिकेचा समावेश झाला आहे.

ठाणेकरांप्रमाणेच कर्मचाऱ्यांच्याही हिताचे निर्णय घेणारी तसेच कर्मचाऱ्यांना कला सादर करण्यासाठी संधी देणारी ही ठाणे महापालिका एकमेव असावी असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.