महापालिका प्रशासनाने मालमत्ता करावरील दहा टक्के सवलत योजनेस १५ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच १६ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत ३ टक्के आणि १६ ते ३१ ऑगस्टपर्यंत कर जमा केल्यास २ टक्के सवलत देण्यात येणार आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्या आणि दुसऱ्या सहामाहीचा मालमत्ता कर एकत्रित भरणाऱ्या नागरिकांसाठी पालिकेने सवलती जाहीर केल्या होत्या. त्यानुसार १६ जूनपर्यंत कराचा भारणा करणाऱ्या करदात्यांना दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात आली. तसेच १६ ते ३० जूनपर्यंत ४ टक्के, १ ते ३१ जुलैपर्यंत ३ टक्के आणि १ ते ३१ ऑगस्टपर्यंत कर जमा करणाऱ्यांना २ टक्के सवलत देण्यात आली. परंतु हा कालावधी कमी असून करसवलत योजनेस मुदतवाढ द्यावी अशी मागणी माजी महापौर नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्याकडे केली होती. ही मागणी मान्य करत आयुक्त शर्मा यांनी या योजनेस मुदतवाढ दिली.

Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Chandrapur may Face Water Crisis as water level of Dams decreasing
चंद्रपूर : जलाशय व धरणे कोरडे पडण्याच्या मार्गांवर
12 different products in maharastra received gi tags
तुळजापूरच्या कवड्याच्या माळेसह कोणत्या उत्पादनांना मिळाले जीआय मानांकन? जाणून घ्या सविस्तर…
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

त्यानुसार १५ जुलैपर्यंत कराचा भारणा केल्यास दुसऱ्या सहामाहीच्या देयकातील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच १६ जुलै ते १५ ऑगस्टपर्यंत ३ टक्के आणि १६ ते ३१ ऑगस्टपर्यंत कर जमा केल्यास २ टक्के सवलत देण्यात येणार आहे. दरम्यान करदात्यांना सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कर भरता येणे शक्य व्हावे, यासाठी प्रभाग समितीमधील कर संकलन केंद्रे प्रत्येक शनिवारी सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ यावेळेत सुरु ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. महापालिकेच्या कोणत्याही प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील करदाते त्यांचा मालमत्ता कर महापालिकेच्या कोणत्याही कर संकलन केंद्रावर रोख, धनादेश, धनाकर्ष तसेच डेबीट कार्ड, एटीएम कार्ड, क्रेडीट कार्डद्वारे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत जमा करु शकतील. याशिवाय http://www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर किंवा propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे कर भरता येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.