ठाणे : आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने विविध विभागांच्या करासह पाणी देयकांच्या वसुलीसाठी विशेष मोहिम हाती घेतली असून या मोहिमेत थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारत गेल्या पंधरा दिवसांत २ कोटी  ९५ लाखांची थकित रक्कम वसुल केली आहे. तसेच गेल्या सात महिन्यात एकूण ५१ कोटी २१ लाख ८८ हजार पाणी देयकांची वसुली झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा वसुलीच्या रक्कमेत ३४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही मोहीम यापुढेही सुरुच राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केल्याने थकबाकीदरांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा >>> अंबरनाथः चौक्या शोभेपुरत्याच;रासायनिक सांडपाणी नेणाऱ्या टँकरची तपासणी नाहीच

bmc, mumbai municipal corporation, Tree Lights, Citing Environmental Concerns, tree lights in mumbai, mumbai tree lights, bmc Orders Removal of Tree Lights, mumbai news, environment news, dangerous for insects, bmc news, marathi news,
झाडांवरील रोषणाई सात दिवसात हटवा, पालिका प्रशासनाचे विभाग कार्यालयाना आदेश
Kandalvan, Kandalvan belt,
ज्वलनशील पदार्थांद्वारे कांदळवनावर घाला, सिडकोकडील २३० हेक्टर कांदळवन पट्टा हस्तांतरीत करण्यास टाळाटाळ कशासाठी ?
Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
Term of work of bridge over Mula river is over but the work continues
पिंपरी : मुळा नदीवरील पुलाच्या कामाची मुदत संपली तरी काम सुरूच! आता सजावटीसाठी २० कोटींचा खर्च

ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाणी पुरवठा विभागाच्या वसुलीसाठी विशेष मोहिम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी १७ ऑक्टोबरला पाणी पुरवठा विभागाची बैठक घेतली होती. त्यात पाणीपट्टी वसुली, थकबाकी याबाबत प्रकर्षाने चर्चा करुन आवश्यक उपाययोजना राबविणे व आवश्यक ती कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधिताना दिल्या. त्यानुसार पाणी पुरवठा विभागाने थकबाकीदारांविरोधात विशेष मोहिम हाती घेऊन त्यांच्याविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. या मोहिमेत पाणी देयक भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई करून त्यांच्याकडून थकीत रक्कम वसुल करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> ठाणे: ९९ लाख व्यवसायिकाच्या खात्यातून सुमारे एक कोटी रुपये गायब

या मोहिमेत १८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे. त्यात, १०४८ मालमत्तांचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला. तर १२८ जणांचे मोटरपंप जप्त करुन ६३० जणांना नोटीस बजावण्यात आली होती. या कारवाईमध्ये २९ पंपरुमाला टाळे लावण्यात आले होते. यामुळे गेल्या पंधरा दिवसांच्या कालावधीत २ कोटी ९५ लाख इतकी थकबाकी वसुल करण्यात आली आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. ही मोहीम यापुढेही सुरुच राहणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त हेरवाडे यांनी स्पष्ट केले असून यामुळे थकबाकीदरांचे धाबे दणाणले आहेत.

मागील सात महिन्यांच्या कालावधीत झालेली प्रभागनिहाय वसुली

दिवा – ४,३२,७३,०८५ 

कळवा – ४,५१,७४,२४४ 

लोकमान्य-सावरकर नगर – ३,७७,७१,३४७ 

माजिवडा-मानपाडा – ८,७७,९४,२११  

मुंब्रा – ४,५७,४८,९७९ 

नौपाडा-कोपरी – ५,९९,६७,४२५ 

उथळसर – ४,५९,८८,५६१ 

वर्तकनगर – ४,९९,१९,४८८

वागळे – २,७७,२९,४३१ 

नागरी सुविधा केंद्र – ६,८८,२१,२९५

एकूण – ५१,२१,८८,०६६