ठाण्यात लसीकरणाच्या दहा लाख मात्रा पूर्ण

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध केंद्रांवर दररोज करोना प्रतिबंधक लस देण्यात येते.

महापालिकेकडून मोहिमेला वेग

ठाणे : अपुऱ्या लससाठय़ामुळे रडतखडतपणे सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला गेल्या काही दिवसांपासून वेग आला असतानाच ठाणे महापालिकेने मंगळवारी दहा लाख लशींच्या मात्रांचा टप्पा पूर्ण केला. यामध्ये ४ लाख ७० हजार २८९ महिला तर, ५ लाख ३० हजार ३२५ पुरुषांचे लसीकरण करण्यात आले. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेपूर्वी शहरातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पालिकेने प्रयत्न सुरू केले असून येत्या काही दिवसांत लसीकरणाच्या आकडय़ात वाढ होणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध केंद्रांवर दररोज करोना प्रतिबंधक लस देण्यात येते. शासनाकडून लशींचा पुरेसा साठा मिळत नसल्यामुळे पालिकेला अनेक केंद्र बंद ठेवावी लागत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून हे चित्र बदलेले आहे. पालिकेला पुरेसा लशींचा साठा उपलब्ध होत आहे. यामुळे रडतखडतपणे सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेला वेग आला आहे. तसेच लसीकरणामध्ये महिलांची संख्या कमी असल्याचे लक्षात येताच पालिकेने आठवडय़ातून एकदा महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. यामुळेच पालिकेने आता मंगळवारी दहा लाख लशींच्या मात्रांचा टप्पा पूर्ण केला आहे.

 

लसीकरण असे..

                                  पहिली मात्रा                            दुसरी मात्रा

आरोग्य कर्मचारी             २४,०१९                                १५,७८२

आरोग्य सेवक कर्मचारी     २७,२९०                               १३,८७०

४५-६० वयोगट                 १,८०,११४                           १,१६,२४०

६० वर्षांवरील                   १,३७,७६९                             ८२,००५

१८-४४ वयोगट                 ३,४९,५९८                               ५३,९२७

शहरातील ३९५ गर्भवती महिलांचे, ४३ स्तनदा मातांचे, ४११ तृतीयपंथींचे आणि अंथरुणाला खिळून पडलेल्या १७ व्यक्तींचे करोना प्रतिबंधक लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thane municipal corporation vaccinated around 10 lakhs citizens till date zws

ताज्या बातम्या