Thane Municipal Election Results 2017: ठाण्याचा गड शिवसेनेने राखला, भाजपला धक्का | Loksatta

Thane Municipal Election Results 2017: ठाण्याचा गड शिवसेनेने राखला, भाजपला धक्का

महापालिकेतील १३१ जागांसाठी १, १३४ उमेदवार रिंगणात

Thane Municipal Election Results 2017: ठाण्याचा गड शिवसेनेने राखला, भाजपला धक्का

ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेने एक हाती सत्ता काबीज केली आहे. ठाण्यात १३१ पैकी ६७ जागांवर विजय मिळवला असून मुंबईत बहुमत गाठण्यात अपयश आलेल्या शिवसेनेला ठाण्यातील यशाने काही अंशी दिलासा मिळाला आहे. भाजपला ठाण्यात हादरा बसला असून हा पक्ष थेट तिस-या स्थानी पोहोचला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने ३४ जागांसह दुस-या स्थानी झेप घेतली आहे. मनसेला ठाण्यात खातेही उघडता आलेले नाही.

LIVE : मुंबईतील निकालाचे अपडेट्स !

ठाणे महापालिकेतील ३३ पॅनेलमधून १३१ जागांसाठी १, १३४ उमेदवार रिंगणात होते. मतदार यादीतील गोंधळानंतरही यंदाच्या महापालिका निवडणुकीत ठाणेकरांनी मोठा उत्साह दाखवल्याने मतदानाच्या टक्केवारीत चांगली वाढ झाली होती. पालिका क्षेत्रातील १२ लाख २८ हजार मतदारांपैकी ७ लाख २४ हजार ९०३ मतदारांनी (५९ टक्के) मतदानाचा हक्क बजावला होती.  ठाणे हा शिवसेनेचा गड आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष स्वबळावर लढले आहेत. विधानसभा निवडणुकीत ठाणे शहरातून भाजप आमदार आल्याने भाजपचा आत्मविश्वास दुणावला होता. त्यामुळे विधानसभेची पुनरावृत्ती यंदाच्या निवडणुकीतही होईल अशी आशा भाजपला होती. अन्य पक्षांमधून उमेदवार आयात केल्याने भाजपमध्ये नाराजी पसरली. भाजपसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आव्हान रोखताना शिवसेनेचा कस लागणार असे चित्र होते. ठाण्यात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. पक्षाच्या मजबूत बांधणी आणि बंडखोरांना शांत करण्यात आलेले यश यामुळे शिवसेनेला सत्ता काबीज करण्यात आले आहे. ठाण्यात शिवसेनेची सत्ता कायम राहिल्याने एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ठाण्यात भाजपची पिछेहाट झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसला अनपेक्षित यश मिळाले आहे. संध्याकाळपर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचा नंबर लागला आहे. भाजप तिस-या स्थानी असून मनसेला भोपळाही फोडता आला नाही. तर काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांचा पराभव हा पक्षाच्या जिव्हारी लागला आहे. मुंब्रामध्ये एमआयएमचे दोन उमेदवार निवडून आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणा-या मुंब्रामध्ये एमआयएमचा प्रवेश ही पक्षासाठी चिंताजनक बाब असल्याचे दिसते.

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी, गुंडपुंडांचे प्रवेश, बंडखोरी, नातेवाईकांना तिकिट दिल्यावरुन झालेला वाद, महापालिका आयुक्तांपासून थेट दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाचा वापर करत रंगलेले कुरघोडीचे राजकारण यामुळे ठाणे महापालिकेची निवडणूक गाजली होती. पण या निवडणुकीत ठाणेकरांनी घराणेशाही नाकारल्याचे चित्र दिसते.

LIVE: नाशिकमधील निकालाच्या अपडेट्स

LIVE: उल्हासनगर, सोलापूर, अमरावती, अकोलामधील निकालाच्या अपडेट्स

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतल्याने दिवाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. दिवामध्ये ११ जागा असून गेल्या निवडणुकीत दिवाच्या मतदारांनी मनसेला कौल दिले होते. पण मनसेच्या तिकिटावर निवडून आलेले शैलेश पाटील यांनी यंदा शिवसेनेत प्रवेश केला. दिव्यातील ११ पैकी ८ जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. तर तीन जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत.  शिवसेनेच्या दृष्टीने धक्कादायक बाब म्हणजे माजी महापौर एच एस पाटील, आमदार सुभाष भोईर यांचा मुलगा सुमित भोईर यांचा पराभव झाला आहे. तर खासदार राजन विचारे यांचा पुतण्या मंदार विचारे यांचा पराभव झाला आहे. तर पत्नी नंदिनी विचारे यांचा विजय झाला आहे.

दिवसभरातील ठळक घडामोडी:

०५:३०: प्रभाग क्रमांक १८अमधून आमदार रवींद्र फाटक यांच्या पत्नी जयश्री फाटक विजयी.

०४:४५: ठाणे प्रभाग क्रमांक १९ मध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी

०४:४०: मुंब्रामध्ये एमआयएमने खाते उघडले, दोन जागांवर विजयी.

०४: ३४: बसपमधूवन भाजपमध्ये आलेले विलास कांबडे प्रभाग क्रमांक १५ ड मधून विजयी.

०४: २९: ठाण्यात काँग्रेसला हादरा, शहराध्यक्ष मनोज शिंदे यांचा पराभव

०४: २०: प्रभाग १८ मध्ये शिवसेनेचे सर्व उमेदवार विजयी.

०४:०७: ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागांवर आघाडीवर.

०४:०३: ठाण्यात भाजप १७ जागांवर आघाडीवर.

०३:५५: ठाण्यात शिवसेना ४२ जागांवर आघाडीवर.

०३:00: – भाजप १२ जागांवर आघाडीवर

०२:१७: ठाण्यात सुधाकर चव्हाण यांचा पराभव, शिवसेनेच्या परिषा सरनाईक विजयी.

०२:१२: चांगल्या सोयीसुविधा दिल्यानेच ठाण्यातील लोकसंख्या वाढत आहे – एकनाथ शिंदे

०२:०७: पक्षप्रमुख सांगतील त्यावेळी राजीनामा देऊ – एकनाथ शिंदे

०१:५९: ठाण्यात शिवसेना ३४ जागांवर आघाडीवर.

०१:५०: ठाण्यात मनसे अजूनही चार जागांवर आघाडीवर.

०१:४४: राष्ट्रवादी काँग्रेसने १६ जागांवर आघाडी घेत दुस-या स्थानावर झेप घेतली.

०१:३८: ठाण्यात शिवसेना ३० जागांवर आघाडीवर.

०१:३०: उल्हासगनरमध्ये ओमी कलानी यांच्याशी जवळीक करुनही शिवसेनेने काँटे की टक्कर – एकनाथ शिंदे

०१:२४: ठाण्यात शिवसेना बहुमताचा आकडा गाठणार – पालकमंत्री एकनाथ शिंदे

०१:१०: ठाण्यात सत्तास्थापनेसाठी ६६ ची मॅजिक फिगर.

०१:०६: दिवामध्ये ११ पैकी ८ जागांवर शिवसेनेचा विजय, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात तीन जागा.

०१:०२: दिवामधील तिन्ही पॅनलमधील निकाल जाहीर, दिव्यात मनसेचे इंजिन यार्डात, ११ पैकी एकाही जागेवर विजय नाही.

१२:५६: प्रभाग क्रमांक ६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा चारही जागांवर विजय

१२: ४१: प्रभाग क्रमांक ४ मध्ये माजी महापौर आणि शिवसेनेचे उमेदवार एच एस पाटील यांचा पराभव

१२:३४: मुंब्रा- प्रभाग क्रमांक २६ अमध्ये राष्ट्रवादीच्या अनिता किणे, बमध्ये काँग्रेसच्या दिपाली भगत, कमध्ये काँग्रेसचे कुरेशी यासीन अय्यूब, डमध्ये विश्वनाथ भगत विजयी.

१२:२६: दिवामध्ये प्रभाग क्रमांक २८ मध्ये शिवसेनेचे चार उमेदवार आघाडीवर.

१२:२०: ठाण्यात भाजपला फक्त ६ जागांवरच आघाडी.

१२:१३: ठाण्यात भाजपला हादरा, भाजपची तिस-या स्थानी घसरण.

१२:०८: ठाण्यात काँग्रेसने खाते उघडले, एका जागेवर काँग्रेस उमेदवार आघाडीवर.

१२: ०३: प्रभाग क्रमांक १२ बमध्ये नंदिनी विचारे यांचा विजय.

११:५९: प्रभाग क्र १८ मध्ये शिवसेनेचे चार उमेदवार विजयी.

११:५४: प्रभाग क्रमांक १२ मध्ये शिवसेनेच्या मंदार विचारे यांचा भाजपच्या नारायण पवार यांनी पराभव केला.

११:५०: प्रभाग क्रमांक १२ मध्ये शिवसेनेच्या मंदार विचारे यांचा पराभव, खासदार राजन विचारे यांना दणका

११:४२ः प्रभाग क्रमांक २९ बमधून मनसेच्या पार्वती म्हात्रे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलोचना पाटील यांचा विजय

११: ३५: प्रभाग क्रमांक ४ मधून भाजपचे उमेदवार विजयी.

११:३२: ठाण्यात काँग्रेसला अजूनही खाते उघडता आलेले नाही.

११:२५: ठाण्यात तीन जागांवर मनसे आघाडीवर.

११:२१: प्रभाग क्रमांक २७ मधून शिवसेनेचे चारही उमेदवार विजयी.

११:१८: प्रभाग १८ मध्ये शिवसेनेचे चारही उमेदवार आघाडीवर

११:१३: ठाण्यात भाजप सहा जागांवर आघाडीवर.

११:१०: ठाण्यात शिवसेना २०, राष्ट्रवादी १८ जागांवर आघाडीवर

११: ०६: प्रभाक क्रमांक २९ अ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजी पाटील यांनी शिवसेनेच्या सुमित भोईर यांचा पराभव केला.

११:०२: ठाण्यात शिवसेना सुमारे २० जागांवर शिवसेना आघाडीवर.

१०: ५८: ठाण्यात शिवसेनेला मोठा हादरा, आमदार सुभाष भोईर यांचा मुलगा सुमित भोईरचा पराभव.

१०: ५३: शिवसेना १०, राष्ट्रवादी ३ , मनसे १ आणि बालाजी ककडेचे अपक्ष पॅनल आघाडीवर

१०: ४९: सेनेच्या साधना जोशी, नम्रता घरत, मनेरा, ओवळेकर आघाडीवर

१०: ४५: ठाण्यात आठ जागांवर शिवसेना तर एका जागेवर भाजप आघाडीवर

१०: ४३: ठाण्यात ३ जागांवर शिवसेना तर एका जागेवर भाजप आघाडीवर.

१०:४०: दिव्यातील प्रभाग क्रमांक २७ मध्ये चारही जागांवर शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर.

१०: ३७: ठाण्यात शिवसेना २ जागांवर, तर भाजप एका जागेवर आघाडीवर

१०: ३४: दिव्यातील प्रभाग क्रमांक २७ अमध्ये शिवसेनेचे शैलेश पाटील आघाडीवर, तर भाजपचे सचिन भोईर दुस-या स्थानी. मनसेला मोठा हादरा.

१०:३२: प्रभाग क्रमांक १५ मध्ये शिवसेनेच्या सुप्रिया सोडारी यांची लढत भाजपच्या सुवर्णा विलास कांबळे आणि काँग्रेसच्या स्मिता सुरेश कांबळे यांच्याशी.

१०: २९: दिव्यात पहिल्या फेरी अखेरीस कोणत्याही पक्षाला आघाडी नाही.

१०:२५: प्रभाग क्रमांक १९ मध्ये शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि विद्यमान नगरसेवक नरेश म्हस्के, विकास रेपाळे, मीनल संख्ये आणि आमदार रवींद्र फाटक यांची भावजय नम्रता फाटक विरुद्ध भाजपमध्ये दाखल झालेले माजी नगरसेवक जनार्दन खेतले, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेले मिलिंद बनकर, पूजा गद्रे आणि प्राजक्ता जाधव यांच्यात लढत.

१०: २१: प्रभाग क्रमांक १८ मध्ये शिवसेनेचे दीपक वेतकर, जयश्री फाटक, महापौर संजय मोरे यांची पत्नी सुखदा आणि राम रेपाळे विरुद्ध भाजपचे गीता देशमुख, मोगीबेन पटेल, स्नेहल पाटील आणि अंकुश इंगवले यांच्यात लढत.

१०:१७: प्रभाग क्रमांक १६ मध्ये काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे आणि शिवसेनेचे गुरुमुखसिंग यांच्यात लढत. काँग्रेससाठी ही लढाई प्रतिष्ठेची.

१०:१५: डायघर येथील प्रभाग क्र. २९चा निकाल सर्वात पहिले लागण्याची शक्यता.

१०: १२ः प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजपच्या संजय वाघुले आणि शिवसेनेच्या हिराकांत फर्डे यांच्यात लढत

१०:१०: प्रभाग क्रमांक ६ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे हणमंत जगदाळे आणि अपक्ष उमेदवार भैय्यासाहेब इंदिसे यांच्यात लढत

१०: ०७: ठाणे महापालिकेतील शिवसेनेवर घराणेशाहीचा आरोप, देवराम भोईर यांच्या कुटुंबात चार जणांना उमेदवारी तर एच. एस पाटील यांच्या कुटुंबात तीन जणांना उमेदवारी

१०:०३: ठाण्यातील मतमोजणी केंद्र,  श्री माँ विद्यालय – पातलीपाडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रदर्शन व स्मृती केंद्र- पोखरण रोड दोन,  महिला बचत गट इमारत – वर्तकनगर, आय.टी.आय. वर्कशॉप इमारत- रामनगर, ठाणे हेल्थ क्लब तरण तलाव – दादोजी कोंडदेव प्रेक्षागृह,  होली क्रॉस शाळा – कॅसल मिल,  सहकार विद्या प्रसारक मंडळ शाळा- कळवा, ए. एफ. कालसेकर डिग्री कॉलेज – मुंब्रा, बॅडमिंटन हॉल- मुंब्रा (दोन केंद्रे), ए. ई. कालसेकर कॉलेज- मुंब्रा

१०:००:  ठाण्यात मतमोजणीला कडेकोट बंदोबस्तात सुरुवात.

९:५५:  सकाळी दहा वाजता शहरातील १२ केंद्रांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. दुपारी दोनपर्यंत ठाण्याची सत्ता कुणाच्या हाती जाणार, याचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

९:५०: ठाणे महापालिका निवडणुकीपूर्वी २६ विद्यमान नगरसेवकांनी केले होते पक्षांतर.

९: ४९ः २०१२ च्या निवडणुकीत मनसेला ७ जागांवर विजय मिळाला होता.

९.४७: २०१२ च्या राष्ट्रवादी काँग्रेसला २४ जागा, तर काँग्रेसला १८ जागा मिळाल्या होत्या.

९:४५: २०१२ च्या महापालिका निवडणुकीत शिवसेना ५३ तर भाजप ८ जागांवर विजयी. २०१२ मध्ये दोन्ही पक्षांची होती युती.

९:४०: प्रभाग क्रमांक १७ मध्ये एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे आणि भाजपच्या स्वाती घाडीगावकर यांच्यात लढत

९.३५: अॅक्सिस – इंडिया टुडे एक्झिट पोलनुसार ठाणे महापालिकेत शिवसेनेला बहुमत मिळण्याची शक्यता. शिवसेनेला ६२ ते ७० जागा मिळाची शक्यता. भाजप तिस-या स्थानावर घसरणार. २९ ते ३४ जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस दुस-या स्थानी येणार.

९:३०: भाजपला जेथून चांगल्या जागांची अपेक्षा आहे अशा घोडबंदर भागात १९ जागा.

९.२७: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या कळवा-मुंब्रा परिसरात ३६

९.२२: ठाणे महापालिका हद्दीतील १३१ जागांकी जवळपास ६५ पेक्षा अधिक जागा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात.

९.२०: ठाणे शहरावर गेल्या चार दशकांहून अधिक काळ वरचष्मा राखणाऱ्या शिवसेनेला धोबीपछाड देण्यासाठी यंदा भाजपने ताकद पणाला लावली आहे.

९.१५: ठाण्यात निकालापूर्वी ढोलताशे, मिठाई, फटाके, पुष्पगुच्छाच्या विक्रीत दररोज पेक्षा ३० टक्क्यांनी वाढ.

९.१०: ठाण्यात  प्रभाग क्रमांक ५ मध्ये अपक्ष उमेदवार सुधाकर चव्हाण आणि शिवसेनेच्या परिषा सरनाईक यांच्यात लढत.

९.०५: दिव्यातील निकालाकडे सर्वांचे लक्ष. दिवामध्ये ११ जागा असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंनी या भागात सभा घेतली.

९.००: ठाणे महापालिकेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठापणाला.

८.५७: ठाणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांपैकी ४० टक्के उमेदवार शालांत परीक्षांचा टप्पाही ओलांडू शकलेले नाहीत.

८.५६: ठाणे महापालिकेतील ३३ प्रभागांमधून १३१ जागांसाठी लढत.

८.५५: ठाणे महापालिकेचा आज निकाल लागणार.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-02-2017 at 08:51 IST
Next Story
दुपारी दोनपर्यंत चित्र स्पष्ट!