ठाणे: कळव्यात संतप्त प्रवाशांनी रोखली एसी लोकल; ट्रॅकवर उतरुन आंदोलन

रेल्वे पोलिसांनी काही प्रवाशांना ताब्यात घेतले आहे

ठाणे: कळव्यात संतप्त प्रवाशांनी रोखली एसी लोकल; ट्रॅकवर उतरुन आंदोलन

ठाणे-कळवा रेल्वे स्थानकात प्रवाशांनी आज आक्रमक होत आंदोलन सुरू केले असून, एसी लोकल रोखल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्याने प्रवासी संतप्त झाले असल्याचे समोर आले आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण : एसी लोकलविरोधात रोष कशासाठी? सामान्य लोकलचा प्रवासी दुर्लक्षित?

सव्वा आठची कळवा कारशेड मधून सुटणारी ठाणे- सीएसमटी लोकल आहे. जी पूर्वी साधी होती. त्यामुळे कळव्यातील अनेक प्रवासी या गाडीतून कारशेडने प्रवास करत होते. आता ही लोकल एसी केल्याने प्रवाशांना लोकल मिळाली नाही. त्यामुळे कारशेडजवळ सुमारे पाऊण तास लोकल थांबवून ठेवली होती.

संतप्त प्रवाशांनी काही वेळासाठी एसी लोकल रोखली होती. मात्र त्यानंतर रेल्वे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत प्रवाशांना तिथून हटवलं. यानंतर लोकल वाहतूक पूर्ववत केली गेली. याशिवाय, रेल्वे पोलिसांनी काही प्रवाशांना ताब्यात देखील घेतले आहे.

पाचवी आणि सहावी मार्गिका एक्स्प्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र असूनही त्या गाड्या उपनगरीय रेल्वे मार्गावरून सोडल्या जात आहेत. त्यामुळेही प्रवासी संघटना आक्रमक आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane passengers protest at kalwa station ac local blocked msr

Next Story
ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात मनाई आदेश जारी ; जिल्ह्यात १०६ सार्वजनिक तर ३४४ खासगी दहीहंडी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी