सुरेश पुजारीचा ताबा ठाणे पोलीस घेण्याची शक्यता ; ठाणे आयुक्तालय क्षेत्रात २५ गुन्हे दाखल

फिलिपाईन्स देशातील परानाक्यू शहरात सुरेश पुजारी याला तेथील स्थानिक पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

ठाणे: कुख्यात गुंड सुरेश पुजारी याला फिलिपाईन्स येथील स्थानिक पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या प्रत्यार्पणासाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. सुरेश पुजारी याचे प्रत्यार्पण झाल्यानंतर ठाणे पोलिसांनीही त्याचा ताबा मिळविण्यासाठी केंद्राच्या गृहमंत्रालयासोबत पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सुरेश पुजारी याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, खंडणी, संघटित गुन्हेगारी, धमकावण्याचे २५ गुन्हे दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फिलिपाईन्स देशातील परानाक्यू शहरात सुरेश पुजारी याला तेथील स्थानिक पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. भारतीय यंत्रणेने त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात सुरेश पुजारी याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न, खंडणी मागणे, धमकावणे, संघटित गुन्हेगारी यांसारखे २५ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सुरेश पुजारी याच्या प्रत्यार्पणासाठी सरकार प्रयत्न करत असताना आता ठाणे पोलिसांकडूनही केंद्र सरकारने पत्रव्यवहार करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सुरेश पुजारी याचा ताबा ठाणे पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.  सुरेश पुजारीविरोधात उल्हासनगर येथे पाच, बदलापूर येथे दोन, अंबरनाथ दोन, मध्यवर्ती दोन, शिवाजीनगर दोन, खडकपाडा दोन, डोंबिवली दोन, महात्मा फुले दोन, कोळसेवाडी एक, विठ्ठलवाडी एक, श्रीनगर एक, हिललाईन एक, विष्णुनगर एक आणि कोनगावमध्ये एक असे एकूण २५ गुन्हे दाखल आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Thane police likely to take possession of suresh pujari zws

ताज्या बातम्या