भिवंडी येथे नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्या आणि सिरपची विक्री करणाऱ्या दोघांना शांतीनगर पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले आहे. नमीद शेख (२२) आणि हुजेफा शेख अशी आरोपींची नावे असून पोलिसांनी त्यांच्याकडून १२० सिरपच्या बांधल्या आणि १५०० गोळ्या असा मुद्देमाल जप्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भिवंडी येथील अवचितपाडा परिसरात काहीजण अमली पदार्थ विक्रीस येणार असल्याची माहिती शांतीनगर पोलिसांनी मिळाली होती. त्याआधारे मंगळवारी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने सापळा रचून नमीद आणि हुजेफा या तरूणांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे नशेसाठी वापरले जाणारे पदार्थ आढळून आले. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पदार्थ त्यांनी कुठून आणले त्याचा तपास पेलिसांकडून सुरू आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thane police takes two people in custody sgy
First published on: 08-06-2022 at 12:17 IST