‘लोकसत्ता’ आयोजित भक्तीसंगीत कार्यक्रमाला रसिकांचा ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद 

ठाणे : विठ्ठल भक्तीचा सूरसोहळा याचि देही याचि डोळा अनुभवण्याची संधी देणारा ‘लोकसत्ता’ आयोजित ‘नामरंगी रंगले’ हा कार्यक्रम शनिवारी, २७ नोव्हेंबर रोजी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात रंगणार आहे. तब्बल दीड वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भक्तीसंगीताचा कार्यक्रम पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असलेल्या प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला हाऊसफुल्ल  प्रतिसाद दिला आहे. कार्यक्रमासाठीच्या प्रवेशिका आधीच संपल्या असून कोविड-१९ संबंधी शासनाने आखून दिलेल्या आसनक्षमता मर्यादेत हा कार्यक्रम सादर होत आहे.

‘केसरी टूर्स’चे प्रमुख प्रायोजकत्व लाभलेल्या, ‘महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ’, ‘ब्रह्मविद्या साधक संघ’ आणि ‘पुराणिक बिल्डर्स’ सहप्रायोजित ‘नामरंगी रंगले’ ही भक्तीसंगीताची मैफिल डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात शनिवारी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्पियन्स’च्या मंचावरून प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन ही मैफल रंगवणार आहेत. तर कार्यक्रमाचे निवेदन कुणाल रेगे करणार आहेत. 

  करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रथमच ‘लोकसत्ता’ने अशा मोठय़ा भव्य संगीत कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सतत ऑनलाइन कार्यक्रमांना कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठीही हा कार्यक्रम पर्वणी ठरणार आहे.

प्रायोजक

मुख्य प्रायोजक – केसरी टूर्स

सहप्रायोजक – महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ब्रह्मविद्या साधक संघ आणि  पुराणिक बिल्डर्स