डोंबिवली जवळील कोपर रेल्वे स्थानकात गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांच्या हातामधील पिशव्या, मोबाईल लांबविण्याचे प्रकार चोरट्यांकडून सुरू होते. प्रवाशांच्या लोकलमधील पिशव्या चोरण्यात येत होत्या. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी कोपर रेल्वे स्थानकात पाळत ठेवून प्रवाशांच्या पिशव्या चोरणाऱ्या भामट्याला अटक केली आहे. संजीवन बाळू सूर्यराव (36, राहणार ठाणे, तालुका शहापूर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

प्रवासी लोकलमध्ये चढण्याच्या गडबडीत असताना संजीवन अशा महिला, पुरुष, जवळ लहान मुले असलेल्या प्रवाशांवर पाळत ठेवून त्याच्या हातामधील पिशवी किवा मोबाईल हिसकावून पळून जात होता. काही दिवसांपासून कोपर रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या हातामधील पिशव्या पळवण्याचे प्रकार वाढले होते. डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या लोकल मधील मंचावर ठेवलेल्या पिशव्या चोरीला जात होत्या.

uran potholes marathi news
उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था
Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
Men travel in womens coaches Safety of women passengers of air-conditioned local at risk
मुंबई : महिला डब्यातून पुरुषांचा प्रवास, वातानुकूलित लोकलच्या महिला प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
Mumbai Coastal Road, Cracks Appear, Controversy Over Traffic Flow, Pedestrian Walkway, bmc, hajiali Pedestrian subway, Pedestrian subway flood in mumbai,
मुंबई : सागरी किनारा मार्गावरील मार्गिकांच्या संख्येवरून नवा वाद, आरोपाचे अधिकाऱ्यांकडून खंडन

संजीवन चोरी कशी करायचा?

संतोष शिंदे हे प्रवासी भायखळा ते कल्याणच्या दरम्यान शनिवारी प्रवास करत होते. लोकल कोपर रेल्वे स्थानकात आल्यावर त्यांची पिशवी एका अज्ञात व्यक्तीने शिंदे यांना गाफील ठेवून लोकलमधील मंचावरून काढून घेतली आणि लोकल सुरू होताच पळ काढला. संतोष शिंदे यांनी चोर चोर म्हणून ओरडा करताच पादचाऱ्यांनी कोपर रेल्वे स्थानकात चोरट्याला पकडले. त्याला रेल्वे स्थानकात गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या ताब्यात दिले. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजीवन याने यापूर्वी असे किती चोरीचे प्रकार केले आहेत, याचा तपास लोहमार्ग पोलिसांनी सुरू केला आहे.