Thane Railway station Rape of female passenger Filed a case police station thane news ysh 95 | Loksatta

ठाणे रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग

ठाणे रेल्वे स्थानक येथील फलाट क्रमांक १० (अ) वर एका प्रवासी महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

ठाणे: ठाणे रेल्वे स्थानक येथील फलाट क्रमांक १० (अ) वर एका प्रवासी महिलेचा विनयभंग झाल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिपक शाहू (२०) याला अटक केली आहे.

हेही वाचा >>> कल्याणमध्ये सिलिंडरमधून गळती होऊन घराला आग; दोन महिला जखमी

पिडीत महिला ही कामानिमित्ताने मंगळवारी सकाळी नवी मुंबई येथील ऐरोली येथे जाण्यास निघाली होती. सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास त्या ठाणे रेल्वे स्थानकातील जिन्यांवरून फलाट क्रमांक १० (अ) वर उतरत असताना दिपक शाहू हा त्याठिकाणी आला. त्यावेळी त्याने महिलेचा विनयभंग केला. या घनटेनंतर महिलेने त्याला पकडले. त्यावेळी फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे (आरपीएफ) दोन कर्मचारी होते. त्यांनी दिपकला लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणले. महिलेने दिलेल्या तक्रारीच्या आधारे दिपक शाहू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 14:47 IST
Next Story
भिवंडीत थकबाकीदारांवर कर सवलतींचा वर्षाव