ठाणे : नुकतीच ठाणे जिल्हा सब ज्यूनियर ॲथलेटिक चॅम्पियनशिप ठाण्यात पार पडली. या स्पर्धेतून महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी ठाण्यातील सात खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. या खेळाडूंचे सर्वच स्तरातून कौतूक केले जात आहे.
ठाणे जिल्हा सब ज्युनियर अॅथलेटिक चॅम्पियनशिप २४ आणि २५ जानेवारी २०२६ रोजी घोडबंदर येथील हिरानंदानी इस्टेट जवळील श्रीमा विद्यालयात पार पडली. या स्पर्धेत ठाणे जिल्ह्यातील जवळपास ८५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. वयोगट ८, १०, १२ आणि १४ वर्षाखालील मुल आणि मुली अशा दोन प्रकारात पार पडली.
या स्पर्धेतून निवड झालेले खेळाडू महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये आपली कामगिरी बजावणार आहे. ठाणे जिल्हा सब ज्युनियर अॅथलेटिक चॅम्पियनशिप मधून ठाणे शहरातील ठाणे महापालिका ॲथलेटिक प्रशिक्षण योजनेतील सात खेळाडूंची निवड महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिसाठी झाली आहे. या प्रशिक्षणातील ११ खेळाडूंनी सुवर्ण, ३ रौप्य आणि ८ कांस्य पदके जिंकली आहेत.
ठाणे जिल्हा सब ज्युनियर अॅथलेटिक चॅम्पियनशिपमध्ये खेळाडूंची कामगिरी
– १० वर्षांखालील मुली – अन्वी मोरे हिने स्टँडिंग शॉट पुटमध्ये रौप्य पदक जिंकले. – १४ वर्षांखालील मुली – काव्या कनागळे हिने ८० मीटरमध्ये सुवर्ण आणि लांब उडीमध्ये रौप्य पदक जिंकले. इरा जाधव हिने ३०० मीटरमध्ये कांस्य पदक जिंकले. काव्या कनागळे, इरा जाधव, मायरा सबनीस आणि शुभ्रा करंदीकर यांनी ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्ण पदक जिंकले. – ८ वर्षांखालील मुले – युवान भावसार याने स्टँडिंग बोर्ड जंपमध्ये सुवर्ण आणि ५० मीटरमध्ये कांस्य पदक जिंकले. – १२ वर्षांखालील मुले – अर्चित मोरे याने ६० मीटरमध्ये कांस्य पदक जिंकले. अर्चित मोरे, अक्षित नायर, आरव कर आणि लियाम फर्नांडिस यांनी ४ x १०० मीटर रिलेमध्ये कांस्य पदक जिंकले. – १४ वर्षांखालील मुले – स्नेह कामेरकरने ८० मीटरमध्ये सुवर्णपदक जिंकले. आरव विनेरकरने ३०० मीटरमध्ये रौप्यपदक आणि ८० मीटरमध्ये कांस्यपदक जिंकले. स्नेह कामेरकर, आरव विनेरकर, आदित बोंद्रे आणि स्पर्श पाटील यांनी ४ x १०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक जिंकले.
महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये निवड झालेले विद्यार्थी
– अन्वी मोरे – काव्या कनागळे – इरा जाधव -युवान भावसार -अर्चित मोरे -स्नेह कामेरकर -आरव विनेरकर
महाराष्ट्र राज्य सब ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी ७ खेळाडूंची निवड झाली आहे.या स्पर्धेत देखील सर्व खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी अपेक्षा आहे. टीएमसीपीवाय योजना प्रमूख मीनल पलांडे आणि अशोक आहेर यांनी सर्व खेळाडू आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन आणि शुभेच्छा दिल्या आहेत. – निलेश पाटकर, प्रशिक्षक

