शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडाप्रकरणी ठाणे पोलिसांनी आता कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी पप्या शिंदे राहणार मनोरमा नगर याला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्यासह त्याच्या इतर चार साथीदारांचा देखील पोलीस शोध घेत असून याप्रकरणी आता अटकेच्या कारवाईला वेग आला आहे.
दरम्यान, प्रदीप यांचे पुत्र राम यांनी जोपर्यंत आरोपी सर्व आरोपी विरोधात कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह पोलीस ठाण्यात आणून ठेवू असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कापूरबावडी पोलीस ठाण्यात बाहेर पोलिसाचा प्रचंड फौजफाटा तैनात आहे.
