स्मार्ट सिटीज कौन्सिल इंडियाच्यावतीने तसेच केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशन आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रीय स्मार्ट अर्बनेशन’ परिषदेमध्ये ठाणे महापालिकेच्या ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडला मोबिलिटी सोल्यूशन या प्रकारात पुरस्कार देण्यात आला. तसेच देशातील १०० स्मार्ट सिटीज मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमधून देशातील सर्वात लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी हा सन्मानाचा पुरस्कार ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांना देण्यात आला आहे. यामुळे ठाणे स्मार्ट सिटीला दोन पुरस्कार मिळाले आहेत.

हेही वाचा – ठाण्यातील बेकायदा बांधकामांमुळे आजी-माजी सहाय्यक आयुक्त अडचणीत?

Organizing an international conference on Dr Babasaheb Ambedkar in london
लंडनमध्ये आज आंतरराष्ट्रीय परिषद; शाश्वत, सर्वसमावेशक विकास आणि डॉ. आंबेडकर
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
Job Opportunity Job Opportunities in Indian Army career
नोकरीची संधी: भारतीय लष्करातील संधी

मुंबई येथील हॅाटेल सहारा इंटरनॅशनल येथे राष्ट्रीय स्मार्ट अर्बनेशन परिषद पार पडली. या परिषदेममध्ये नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी यांनी स्मार्ट सिटी मिशनतंर्गत महाराष्ट्राच्या कामगिरीची तसेच सरकारच्यावतीने सुरू असलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली. ठाणे शहरामध्ये केंद्र सरकार, राज्य शासन आणि ठाणे महापालिकेच्यावतीने ठाणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विविध प्रकल्पांचे काम सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्पांचे काम सुरू आहे. स्मार्ट सिटीज कौन्सील इंडिया ही संस्था केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटीज मिशनसोबत काम करीत असून या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी स्मार्ट सिटी विशेष प्रकल्प पुकस्कार देण्यात येतात. यंदा विविध प्रकल्पातंर्गत ठाणे स्मार्ट सिटीला ‘मोबिलिटी सोल्यूशन्स’ या प्रकारात प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर स्मार्ट सिटीज कौन्सिल इंडियाच्यावतीने १०० स्मार्ट शहरांमधून देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी या पुरस्काराने दरवर्षी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला सन्मानित करण्यात येते. ॲानलाईन मतदानाच्या माध्यमातून या पुरस्काराची निवड केली जाते. सन २०२२ चा देशातील सर्वात लोकप्रिय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळवी यांना सन्मानित करण्यात आले आहे. या परिषदेत स्मार्ट सिटीज कौन्सिल इंडियाचे संस्थापक तथा कार्यकारी संचालक प्रताप पदोदे यांच्या हस्ते माळवी यांना पुरस्कार देण्यात आला. यावेळी ॲास्ट्रेलियास्थित एलव्हीएक्स ग्लोबल या कंपनीचे चेअरमन कोरी ग्रे हे उपस्थित होते. महाराष्ट्रासह देशातील इतर स्मार्ट सिटीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, विविध प्रकल्प सल्लागार हे यावेळी उपस्थित होते.