ठाण्यातील सामाजिक कार्यकर्त्यांला मारहाण

तालुक्यातील गारगांव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि गारगाव पूल कृती समितीचे अध्यक्ष संदिप ठाकरे यांना शनिवारी दुपारी जबर मारहाण करण्यात आली.

तालुक्यातील गारगांव येथील सामाजिक कार्यकर्ते आणि गारगाव पूल कृती समितीचे अध्यक्ष संदिप ठाकरे यांना शनिवारी दुपारी जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीत ते जबर जखमी झाले असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
गारगाई नदीवरील पूल तुटून दोन वर्षे झाली. तरी अद्याप पुलाचे काम सुरू होऊ शकले नाही. त्याच्या निषेधार्थ संदिप ठाकरे येत्या सोमवारपासून (२५ मे) उपोषण आंदोलन करणार होते. यासंदर्भात काढण्यात आलेल्या पत्रकावरून शिवसेनेचे जि.प.सदस्य भालचंद्र खोडका यांनी ठाकरे यांना शुक्रवारी जिवे मारण्याची धमकी दिली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Thane social activist beaten up

ताज्या बातम्या