ठाणे : ठाण्यातील माजिवडा भागात दीप ठक्कर (२८) या तरुणाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या केली. आत्महत्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहिली होती. आशा पूर्ण करता आल्या नाही म्हणून त्याने पालक आणि नातेवाईकांची माफी मागितली आहे. तसेच आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे. याप्रकरणाची नोंद वर्तकनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

हेही वाचा – डोंबिवली: गणेशोत्सवाच्या कालावधीत डोंबिवलीतील माणकोली पुलावरील वाहतूक बंद

हेही वाचा – ठाणे : खारफुटीवर भराव प्रकरणी गुन्हा दाखल

माजिवडा येथील वसंत लाॅन्स या इमारतीमधील आठव्या मजल्यावर दीप ठक्कर वास्तव्यास होता. त्याने बी.टेक. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. शुक्रवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास त्याने घरातून खाली उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वर्तकनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्येपूर्वी दीप यांनी एक चिठ्ठी लिहीली होती. यात त्याने आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटले आहे. तसेच पालक आणि नातेवाईकांची माफी मागितली आहे. आशा पूर्ण करता आल्या नाहीत, असेही त्याने म्हटले आहे. दीप हा स्पर्धा परिक्षा देत होता. नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.