ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रथांचे प्रकाशन बुधवारी गडकरी रंगायतन येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सायंकाळी गडकरी रंगायतन परिसरात वाहतुक बदल लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जीवन प्रवास ‘योद्धा कर्मयोगी : एकनाथ संभाजी शिंदे’ या चरित्रग्रंथातून मांडण्यात आला आहे. प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, डॉ. अरुंधती भालेराव लिखित या चरित्रग्रंथाचा प्रकाश सोहळा गडकरी रंगायतन येथे सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. अतिमहत्त्वाचे व्यक्ती गडकरी रंगायतन येथे उपस्थित असणार आहे. त्यामुळे ठाणे वाहतूक पोलिसांनी या भागात वाहतूक बदल लागू केले आहेत. या बदलामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा…कल्याण रेल्वे स्थानकात महिला प्रवाशाला महिला तिकीट कर्मचाऱ्याकडून बेदम मारहाण; तिकिटाच्या सुट्ट्या पैशावरून वाद

वाहतुक बदल पुढील प्रमाणे

-पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स येथून ग्रीन लीफ उपाहारगृह मार्गे गडकरी रंगायतन चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना ग्रीन लीफ उपाहारगृह येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने डॉ. मुस चौक मार्गे वाहतुक करतील.
-डॉ. मुस चौक येथून गडकरी चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना साईकृपा उपाहारगृह येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहने भारतीय स्टेट बँक, राम मारूती रोड मार्गे वाहतुक करतील.

-स्थानक परिसर, डॉ. मुस चौक येथून गडकरी चौकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या बसगाड्यांना डॉ. मुस चौकात प्रवेशबंदी असेल. ही वाहने टॉवर नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.
-टॉवर नाका, गडकरी चौक, डॉ. मुस चौक येथून गडकरी रंगायतनच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना गडकरी चौकात प्रवेशंबदी असेल. येथील वाहने दगडी शाळा, अल्मेडा रोड किंवा गजानन महाराज चौक मार्गे वाहतुक करतील.

हेही वाचा…ठाणे : मद्यपी वाहन चालकावर कारवाई केल्याने वाहतुक पोलीस कर्मचाऱ्याला पाच जणांकडून मारहाण

-चिंतामणी चौक, तलावपाली, सेंट जॉन शाळा येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहने उभी करण्यास मनाई आहे.
-राम मारूती रोड येथे गजानन महाराज चौक ते गोखले रोड या भागात दोन्ही दिशेला वाहने उभी करण्यास मनाई असेल.

हेही वाचा…डोंबिवलीतील सर्थक वेल्थ मॅनेजमेंट कंपनीकडून गुंतवणूकदारांची ७३ लाखाची फसवणूक

-साईकृपा उपाहारगृह ते भारतीय स्टेट बँक येथील मार्गावर दोन्ही दिशेला वाहने उभी करण्यास मनाई असेल.
हे वाहतुक बदल दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत हे वाहतुक बदल लागू असतील.