scorecardresearch

ठाणे : वागळे इस्टेट भागातील पाणी मिरा-भाईंदरने पळवले

शुक्रवारी झालेल्या ठाणे पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली.

Thane Water from Wagle Estate area was stolen by Mira Bhayander

ठाणे येथील वागळे इस्टेट भागातील औद्योगिक परिसरात स्टेम कंपनीमार्फत होणारा १० ते १५ दशलक्ष इतका पाणी पुरवटा कमी करून तो मिरा-भाईंदर शहरात वळवण्यात आल्याची बाब शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली. ठाणे शहराला पाणीपुरवठा वाढवून देण्याचे आदेश देऊनही स्पेंचा अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे या निमित्ताने उघडकीस आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सातत्याने पाणीपुरवठा बंद ठेवला जात असून त्याचा फटका शहरातील नागरिकांना बसत असल्याचा मुद्दा राष्ट्रवादीचे नगरसेवक सुहास देसाई यांनी सभेत उपस्थित केला. पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून सर्वपक्षीय सदस्यांनी सभेत नाराजी व्यक्त केली. तर गेल्या एका महिन्यात काही कारणामुळे वारंवार पाणी पुरवठा बंद ठेवावा लागला होता, अशी कबुली प्रशासनाने यावेळी दिली. अनेक संकुलाना टॅंकरने पाणी पुरवठा होत असून याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक हणमंत जगदाळे यांनी काही प्रश्न उपस्थित केले. स्टेमकडून होणारा पाणी पुरवठा कमी करण्यात आला आहे का? किती पाणी पुरवठा सध्या त्यांच्याकडून होत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

पाणी पुरवठा विभागाचे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी त्यावर स्पष्टीकरण दिले. सध्या स्टेमकडून ११३ दशलक्ष लीटर पाणी पुरवठा होत असून मंजुर असलेल्या कोट्यापेक्षा हा पाणी पुरवठा कमी असल्याने ठाणे शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्टेमने कमी केलेला पाणी पुरवठा मीरा भाईंदरला वळविल्याचेही त्यांनी सांगितले. महापौर नरेश म्हस्के हे स्टेम प्राधिकरणाचे अध्यक्ष असून त्यांनी शहराला वाढीव पाणी  देण्याचे आदेश दिले होते. महापौरांच्या आदेशांनंतरही स्टेमच्या अधिकाऱ्यांनी हे पाणी ठाण्याला दिले नसल्याची बाब स्थायी समितीमध्ये उघड आली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Thane water from wagle estate area was stolen by mira bhayander abn

ताज्या बातम्या