दळणवळणाचे पूल-पर्व
सात बेटांची मिळून मुंबई नगरी बनली, हे सर्वाना ठाऊक आहे. मात्र त्याचबरोबर मुंबईलगतचे ठाणे शहरही खाडीकिनारी वसलेले एक मोठे बेटच आहे. कारण ठाणे शहराच्या तीन बाजू खाडीने वेढलेल्या आहेत. आता ठाणे महानगराचे एक उपनगर अशी ओळख असलेल्या कळव्यातही पूर्वी बोटीने जावे लागे. ब्रिटिश राजवटीत १८६३ मध्ये ठाणे-कळवादरम्यान खाडी पूल उभारण्यात आला आणि दळणवळणाचे नवे पर्व सुरू झाले. त्यापूर्वी दहा वर्षे आधी मुंबईहून ठाण्याला रेल्वे धावू लागली होतीच. १९१४ मध्ये ठाणेकर कंत्राटदार विठ्ठल सायन्ना यांनी जीर्ण झालेला हा खाडी पूल नव्याने बांधला. त्यालाही आता शंभर वर्षे झाली. दरम्यान, या मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेता आता हा पूल नव्याने बांधण्यात येत आहे.
(जुने छायाचित्र संग्राहक-
प्राच्य विद्या संशोधन केंद्र, नवे छायाचित्र- दीपक जोशी)
tmt01